दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून डोक्यात घातला दगड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 15:54 IST2021-11-30T15:53:40+5:302021-11-30T15:54:19+5:30
कोल्हापूर : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही, या रागातून एकाने तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केले. ही ...

दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून डोक्यात घातला दगड
कोल्हापूर : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही, या रागातून एकाने तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना जाधववाडीतील गणेश कॉलनीत घडली. या घटनेत सागर भीमराव कांबळे (वय ३६, रा. जाधववाडी) असे जखमीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सागर कांबळे व विजय कांबळे हे दोघे जाधववाडीतील गणेश कॉलनी येथे एकाच गल्लीत राहतात. रविवारी रात्री उशिरा विजयने सागरकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्याने पैसे देण्यास स्पष्टपणे नकार दिला, त्याचा राग मनात धरून विजयने रस्त्यावर पडलेला मोठा दगड त्याच्या डोक्यात घातला.
यात सागर कांबळे हा गंभीर जखमी झाला. त्याने सोमवारी रात्री उशिरा शाहुपुरी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. या तक्रारीवरून विजयवर गुन्हा दाखल झाला आहे.