शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील चाळीस हजारांवर अवजड वाहनांची चाके थांबणार, ५ मार्चला राज्यव्यापी आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 17:47 IST

ट्रक, बसचा सहभाग, व्यापार, उद्योगावर होणार परिणाम

कोल्हापूर : राज्यात अवजड वाहनांवर ई-चलनाद्वारे करण्यात येणाऱ्या दंडात्मक कारवाई, बॉर्डर चेकपोस्ट बंद करावेत, या मागणीसाठी ट्रान्सपोर्टर आणि चालक संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. ५ मार्चला राज्यव्यापी आंदोलन होत असून, चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला आहे. सरकारने विविध मागण्यांवर तोडगा काढला नसल्यास जिल्ह्यात ४० हजारांहून अधिक अवजड वाहनांची चाके थांबणार आहेत. बेमुदत आंदोलन झाल्यास व्यापार, उद्योगावर परिणाम होणार असून, आयात-निर्यात थांबणार आहे.जिल्ह्यातील वाहतूकदारांनी ई-चलन, चेकपोस्ट नाके, पार्किंगच्या अडचणी प्रश्नी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. जिल्हा प्रशासनालाही निवेदन दिले आहे. मात्र, त्याबाबत अद्याप काही निर्णय झाला नसल्याने जिल्ह्यातील अवजड वाहतूकदार चक्का जाम करण्याच्या तयारीत आहेत.

ई-चलन वसुलीला विरोधपरिवहन विभागाने इ-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. नव्या नियमांत संबंधित वाहनधारकाला दंड केल्यास १५ दिवसांत भरावा लागेल. तो भरला नसल्यास संबंधित प्रकरण न्यायालयात दाखल केले जाणार आहे. त्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी आहे. तेथेही वाहन मालकाने काही तडजोड केली नसल्यास वाहनांवर महसुली बोजा चढविला जाणार आहे. त्यामुळे या कारवाईला अवजड वाहतूकदारांनी विरोध दर्शविला आहे.

काय होणार परिणामकोल्हापुरात सहा, दहा, बारा, चौदा आणि सोळा चाकी ट्रकमधून मालवाहतूक केली जाते. त्यात साखर, गूळ, सिमेंट, वाळू, औद्योगिक वसाहतीतील मोठ्या मशिनरी, एक्स्पोर्स मशीन, कांदा, बटाटा, तेल, आटा, मैद्याची वाहतूक केली जाते. ही वाहतूक कोल्हापुरात गोवा, केरळ, गुजरात राज्यात होते. तर तेथूनही काही साहित्य जिल्ह्यात येते.

कंटेनरमधून मोठी वाहतूककंटेनरमधून मोठ्या मशिनरीची वाहतूक केली जाते. त्यात २२ आणि ४० चाकी ट्रकचा समावेश आहे. त्यामधून पवनचक्कीच्या साहित्याची वाहतूक होते. चक्का जाम झाल्यास या सर्व उद्योग, व्यापारावर परिणाम होणार आहे.

जिल्ह्यातील वाहनांची संख्या

  • टुरिस्ट कॅब : १७६३
  • खासगी बस : २३८०
  • ट्रक, लॉरीज : २२ हजार ४०४
  • ट्रेलर : ३४ हजार ३५०
  • ट्रॅक्टर : ५०७६३
  • स्कूल बस : ८०३

जिल्ह्यातील २२ हजारांवर ट्रक चालक मालक आंदोलन सहभागी होणार आहेत. सरकारने वाहतूकदारांच्या प्रश्नावर अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा चक्का जाम आंदोलनात सहभागी होणार आहे. - हेमंत डिसले, सेक्रेटरी, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशन 

दोन दिवसांपूर्वी वाहतूकदारांचे शिष्टमंडळासोबत चर्चा केली आहे. त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला कळविले आहे. प्रशासन त्याबाबत येत्या काही दिवसांत निर्णय घेईल. - संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur transporters to strike against e-challans, checkposts; state-wide protest.

Web Summary : Kolhapur transporters are protesting e-challans and checkposts, threatening a state-wide strike on March 5th. Over 40,000 vehicles will halt, impacting trade and industry if demands aren't met. The action follows unresolved grievances with transport authorities.