शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत ११पासून राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा

By admin | Updated: December 19, 2014 23:32 IST

बाजारपेठ मित्रमंडळातर्फे आयोजन : संदेश पारकर यांची माहिती; लाखांची बक्षिसे

कणकवली : बाजारपेठ मित्रमंडळाच्यावतीने प. पू. भालचंद्र महाराजांच्या १११व्या जयंती दिनाचे औचित्य साधून ११ ते १८ जानेवारी २०१५ या काळात राज्यस्तरीय खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन येथील मुडेश्वर मैदानावर करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे २७ वे वर्ष असून विजेत्या संघास १ लाख १ हजार १११ रूपये रोख व चषक देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती बाजारपेठ मित्रमंडळाचे अध्यक्ष व कोकण सिंचन पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्पर्धा आयोजन समितीचे सदस्य नगरसेवक रूपेश नार्वेकर, सोमनाथ गायकवाड, प्रसाद अंधारी, आदित्य सापळे, गौतम खुडकर, अमित मयेकर, हरेश निखार्गे, गौरव हर्णे आदी उपस्थित होते.अंतिम सामन्यासाठी ‘थर्ड अंपायर’ असणारनामवंत क्रिकेटपटूंनाही या स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी अद्ययावत स्टेडियम बनविण्यात येणार असून खेळाडूंसाठी ड्रींकट्रॉलीची व्यवस्था केली जाईल. १८ जानेवारी रोजी स्पर्धेच्या अंतिम दिवशी खेळविण्यात येणाऱ्या सामन्यांसाठी ‘थर्ड अंपायर’ नियुक्त केले जाणार आहेत. तसेच मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसाठी मोफत लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. या ड्रॉमध्ये विजयी होणाऱ्याला मोटारसायकल भेट देण्यात येणार आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेच्या ठिकाणी चिअर्स गर्ल्सही उपस्थित राहणार आहेत.८ षटकांच्या या स्पर्धेतील उपविजेत्या संघास रोख रूपये ५० हजार १११ व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तर उपांत्य सामन्यातील पराभूत संघांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रत्येक सामन्यातील सामनावीरालाही गौरविण्यात येणार आहे. प्रत्येक षटकार व चौकारासाठी पारितोषिक देण्याबरोबरच इतर वैयक्तिक बक्षीसेही ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांनी ७ जानेवारीपर्यंत आदित्य सापळे, गौरव हर्णे, मयूर पेडणेकर यांच्याकडे आपली नावे नोंदवावीत, असे आवाहनही यावेळी पारकर यांनी केले. (वार्ताहर)संदेश पारकर म्हणाले, क्रिकेट या खेळाला चालना मिळावी, तसेच नवोदित क्रिकेटपटूंना आपल्या खेळाचे प्रदर्शन घडविण्यासाठी संधी मिळावी, या उद्देशाने गेली २६ वर्षे ही स्पर्धा घेण्यात येत आहे. स्पर्धेच्या २७व्या वर्षी काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. ११ जानेवारी रोजी स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला नामवंत सिनेकलाकार तसेच राजकीय व्यक्तींनाही आमंत्रित करण्यात येणार आहे. उद्घाटन समारंभापूर्वी कणकवली शहरातून भव्य मोटारसायकल रॅली स्पर्धा स्थळापर्यंत काढण्यात येईल. मुंबई, गोवा, बेळगाव, कोल्हापूर, पुणे आदी भागातून ४० संघ या स्पर्धेत सहभागी होतील.