शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

सांगली-औदुंबर जलवाहतूक सुरू करा

By admin | Updated: May 29, 2015 00:03 IST

संजयकाका पाटील : गडकरी यांच्याकडे मागणी करणार

सांगली : सांगली ते कसबे डिग्रज व तेथून औदुंबरपर्यंत कृष्णा नदीतून जलवाहतूक सुरू करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार आहे, अशी माहिती खा. संजयकाका पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. गडकरी शुक्रवार, दि. २९ रोजी सांगली दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध समस्याही त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.ते म्हणाले, सांगली, कसबे डिग्रज व औदुंबर येथे कृष्णा नदीत बंधारे आहेत. कृष्णाकाठच्या लोकांना बंधाऱ्यावरून नदी पार करावी लागते. पावसाळ्यात नदीला पाणी वाढले की पलीकडे जाता येत नाही. यामुळे जलवाहतूक सुरूकेल्यास लोकांचे प्रश्न मिटतील. तसेच विकासाच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी सांगलीतील बंधाऱ्यापासून कसबे डिग्रज व तेथील बंधाऱ्यापासून औदुंबरच्या बंधाऱ्यापर्यंत जलवाहतूक सुरू करावी, अशी मागणी शुक्रवारी गडकरी यांच्याकडे करणार आहोत. केवळ मागणी करून थांबणार नाही, तर त्याचा भविष्यात पाठपुरावा करून हे काम मार्गी लावले जाईल. ते म्हणाले, सांगली-कोल्हापूर रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम गतीने व राष्ट्रीय महामार्गाच्या निकषाने व्हावे, यासाठी या कामाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश करावा, अशी मागणीही गडकरी यांच्याकडे केली जाणार आहे. चौपदरीकरणामुळे अपघातांना आळा बसणार आहे. यासाठी त्याचे काम चांगले व्हावे, अशी सांगली, कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे. हे काम गतीने व्हावे, यासाठीही चर्चा करणार आहे. गुहागर-विजापूर या मार्गाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश करावा, तसेच धुळे, अहमदनगर, बारामती, विटा, तासगाव, काकडवाडी, मिरज, म्हैसाळ ते बेळगाव या मार्गाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश केला जावा, अशीही मागणी करणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)