शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

कडगाव, मिणचे, पिंपळगावमध्ये कोविड सेंटर सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गारगोटी : ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्याने तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या कोविड केअर सेंटरवर ताण वाढलेला असून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गारगोटी : ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्याने तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या कोविड केअर सेंटरवर ताण वाढलेला असून शहरातील खासगी रुग्णालयातील बेड कमी पडू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर भूदरगड तालुक्यातील ग्रामीण भागातील ज्या नागरिकांना सौम्य लक्षणे आहेत. त्यांच्यावर तातडीने उपचार होण्यासाठी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सहकार्याने मडीलगे बुद्रुक, कडगाव, पिंपळगाव, मिणचे या गावात कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या सूचना आमदार प्रकाश आबिटकर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीमध्ये तहसीलदार अश्विनी अडसूळ यांना सूचना दिल्या.

या वेळी आमदार आबिटकर म्हणाले की, राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सद्य:स्थितीमध्ये तालुकास्तरावर असणाऱ्या कोविड सेंटर्स पूर्ण क्षमतेने भरलेली असून तेथे कार्यरत असणारे डॉक्टर्स, नर्स आदी कर्मचाऱ्यांवर ताण निर्माण झालेला आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणे कमी असणाऱ्या रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी कोविड केअर सेंटर तयार करून उपचार केल्यास रुग्ण लवकरात-लवकर बरे होण्यास मदत होणार आहे. त्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र, लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सहकार्याने कडगांव, पिंपळगाव, मिणचे व मडिलगे बुद्रुक येथे कोविड केअर सेंटर सुरू करणेबाबत कार्यवाही करण्यास सांगितले आहे.

यावेळी तहसीलदार अडसूळ म्हणाल्या की, कडगाव, पिंपळगाव, मिणचे व मडिलगे बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा सर्व्हे करून या ठिकाणी तत्काळ कोविड केअर सेंटर्स करण्याची कार्यवाही करण्यात येईल. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन येत्नाळकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

फोटो : आमदार प्रकाश आबिटकर यांचा लावणे.