कोल्हापूर विमानतळावरून ‘स्टार एअरवेज’ची आता बंगळुरू, हैदराबाद विमानसेवा १५ मेपासून
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 12:51 IST2025-04-30T12:50:28+5:302025-04-30T12:51:26+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळावरून आता ‘स्टार एअरवेज’कडून बंगळुरू आणि हैदराबाद या दोन शहरांसाठी येत्या १५ मेपासून विमानसेवा सुरू करण्यात ...

कोल्हापूर विमानतळावरून ‘स्टार एअरवेज’ची आता बंगळुरू, हैदराबाद विमानसेवा १५ मेपासून
कोल्हापूर : कोल्हापूरविमानतळावरून आता ‘स्टार एअरवेज’कडून बंगळुरू आणि हैदराबाद या दोन शहरांसाठी येत्या १५ मेपासून विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. सध्या स्टार एअरवेजकडून कोल्हापूर ते तिरुपती, अहमदाबाद, मुंबई या शहरांसाठी विमानसेवा दिली जाते.
बंगळुरू आणि हैदराबाद या दोन शहरांसाठी आता कोल्हापुरातून इंडिगो आणि स्टार एअरवेज या दोन कंपन्या हवाई सेवा देणार आहेत. खासदार धनंजय महाडिक यांनी यासाठी पाठपुरावा केला आहे. सध्या इंडिगो कंपनीकडून बंगळुरू व हैदराबाद या दोन्ही मार्गांवर विमान उड्डाण करते; पण प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन स्टार एअरवेजने याच मार्गावर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
अशी असेल विमानसेवा
कोल्हापूर-हैदराबाद-कोल्हापूर ही विमानसेवा दर मंगळवारी आणि बुधवारी सुरू राहणार आहे. सकाळी ९:३५ मिनिटांनी स्टारचे विमान हैदराबादवरून उड्डाण करेल आणि १०:४०ला कोल्हापुरात येईल. त्यानंतर दुपारी ३:०० वाजता कोल्हापूर विमानतळावरून उड्डाण केलेले हे विमान सायंकाळी ४:०५ मिनिटांनी हैदराबादमध्ये पोहोचेल.
तर प्रत्येक मंगळवार, बुधवार आणि रविवार या दिवशी कोल्हापूर-बंगळुरू- कोल्हापूर या मार्गावर स्टार एअरवेजचे विमान प्रवाशांना सेवा देईल. कोल्हापुरातून सकाळी ११:०५ मिनिटांनी विमान उड्डाण घेईल आणि १२:३५ला बंगळुरूमध्ये पोहोचेल. तर बंगळुरूमधून दुपारी १:०५ मिनिटांनी विमान कोल्हापूरच्या दिशेने उड्डाण करेल आणि दुपारी २:३५ मिनिटांनी कोल्हापुरात येईल.