शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
4
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
5
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
6
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
7
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
8
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
9
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
10
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
11
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
12
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
14
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
15
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

(स्टार १०६८) अनोळखीकडे मोबाईल द्याल तर क्षणात बँक खाते होईल कंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:28 IST

कोल्हापूर : सोशल मीडियावर ऑनलाईनचा वापर वाढला तसे ऑनलाईनवर गंडा घालणाऱ्यांचेही पेव फुटले. अनोळखी व्यक्तीला मोबाईल दिल्यास त्याचा गैरवापर ...

कोल्हापूर : सोशल मीडियावर ऑनलाईनचा वापर वाढला तसे ऑनलाईनवर गंडा घालणाऱ्यांचेही पेव फुटले. अनोळखी व्यक्तीला मोबाईल दिल्यास त्याचा गैरवापर होण्याची शक्यता दाट आहे. त्याच्याकडून क्यूआर कोड स्कॅन करुन अगर रिटर्न ‘ओटीपी’चा आधार घेऊन तुमचे बँकेतील सर्व रक्कम ती परस्पर काढू शकते. अशा पद्धतीने अनेकांच्या बँक खात्यातील रक्कम परस्पर दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर करुन आपले खाते पूर्ण रिकामे झाल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. अशा पद्धतीने धोका टाळण्यासाठी अनोळखी व्यक्तीला मोबाईल न दिलेलाच बरा.

‘ओटीपी’ मिळविण्यासाठी अशी होते फसवणूक

१) कॉल करण्याच्या निमित्ताने मोबाईल घेऊन...

प्लीज, महत्त्वाचा फोन करायचा आहे, माझ्या फोेनवरील बॅलेन्स संपला. अशी विनवणी करत अनोळखी व्यक्ती आपल्याकडील फोन घेतो. बोलण्यात गुंतवून मोबाईलमालकाचे लक्ष नसल्याचे पाहून त्यातील क्यूआर कोड स्कॅन करतो. मोबाईलवरील ‘ओटीपी’ मिळवतो, त्याच्या आधारे मोबाईल धारकाचे बँक खात्यातील रक्कम आपसुक दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर होते. त्यातून खाते रिकामे होत फसगत होते.

२) लॉटरी लागली आहे असे सांगून...

लाॅटरी लागल्याचा ई-मेल किंवा मेसेज येतो. आनंदाने असा मेसेज उघडून पाहिला जातो. त्यातील लिंकवर क्लिक केल्यास त्यानंतर येणारा ‘ओटीपी’ पुन्हा त्या मेसेजमध्ये शेअर करु नये अन्यथा खात्यावरील सर्व रक्कम हॅकर्सच्या खात्यात जमा होते.

३) केवायसी आवश्यक असे सांगून...

आपल्या बँक खात्याची ‘केवायसी’ अपडेट झालेली नाही. तत्काळ ऑनलाईन अपडेट करुन घ्या; अन्यथा आपले बँक खाते करप्ट होईल. असा फोन येतो. त्यानंतर ‘केवायसी’ अपडेटसाठी लिंक येते. बोलणाऱ्याच्या मोहात पडून आपण सांगेल तसे करतो, आपल्याला आलेला ओटीपी पुन्हा हॅकर्सला शेअर करतो, त्यानंतर क्षणात आपल्या बँक खात्यातील सर्वच रक़्कम उडाल्याचे लक्षात येते.

४) वेगळी लिंक पाठवून...

‘हा संदेश मोबाईल नंबर पोर्टिंगचा आहे. टाईप करा पोर्ट, एक जागा सोडून तुमचा १० अंकी नंबर आणि हा एसएमएस पाठवा .... या नंबरवर आणि तिकडून जे रिप्लाय येतील ते आम्हाला आमच्या पुढील नंबरवर पाठवा (नंबर) याची अनुमती ( मॉडर्न नाव) यांच्याकडून घेतली आहे.’ असा संदेश मोबाईलवर येतो अगर त्याची लिंक येते. माहिती भरल्यास तुमचे बँक खाते रिकामे होते.

ही घ्या काळजी...

कोणतीही बँक, शासकीय अधिकारी आपला ‘ओटीपी’ नंबर मागत नाहीत. त्यामुळे काहीही कारण सांगितले तरीही ‘ओटीपी’ कोणालाही शेअर करु नये.

कोट...

आपल्या अकाऊंटच्या सुरक्षेसाठी ‘टर्न ऑन टू फॅक्टर ऑथिटिकेशन’ पर्याय वापरावा. मोबाईल अगर खाते ओपनसाठी स्ट्राँग पासवर्ड असावा, तो नेहमी बदलत रहावा. आलेला ओटीपी कोणालाही न देता आपले बँक खाते सुरक्षित ठेवता येते. - मंगेश चव्हाण, पोलीस उपअधीक्षक, कोल्हापूर शहर