कोल्हापूर जिल्ह्यात वर्षात झाले ९९ हजार दस्त, मुद्रांकला किती कोटींचा मिळाला महसूल.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 17:37 IST2026-04-01T17:36:45+5:302026-04-01T17:37:16+5:30

मंगळवारी दिवसांत ३३२ नोंदणी : शासनाने दिलेले ८५ टक्के उद्दिष्ट पूर्ण

Stamp Department received a revenue of Rs 568 crore in the financial year 2025-26 In Kolhapur District | कोल्हापूर जिल्ह्यात वर्षात झाले ९९ हजार दस्त, मुद्रांकला किती कोटींचा मिळाला महसूल.. जाणून घ्या

कोल्हापूर जिल्ह्यात वर्षात झाले ९९ हजार दस्त, मुद्रांकला किती कोटींचा मिळाला महसूल.. जाणून घ्या

कोल्हापूर : सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात जिल्हा मुद्रांक विभागाला तब्बल ५६८ काेटींचा महसूल मिळाला. ३१ मार्च या अखेरच्या दिवशी व सुट्टीच्या दिवशी अंदाजे ३३२ दस्त झाले असून, सव्वादोन कोटींच्या महसुलाची नोंद झाली. मुद्रांक विभागाला या आर्थिक वर्षात ६७० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी साधारण ८५ टक्क्यांपर्यंतचे उद्दिष्ट पूर्ण झाले.

मुद्रांक कार्यालये म्हणजे जिल्ह्याची आर्थिक वाहिनी असते. या विभागाला सर्वाधिक महसुलाचे उद्दिष्ट दिले जाते. या वर्षी विभागाला ६७० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ३१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत ८४.६७ टक्के इतके उद्दिष्ट पूर्ण झाले. जिल्ह्यात या विभागाची १८ कार्यालये असून मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत दस्तनोंदणी करता येत असल्याने हे कार्यालय उशिरापर्यंत सुरू होते.

सुट्टी दिवशी झालेले दस्त

दिवस : दस्त संख्या : मुद्रांक शुल्क : नोंदणी फी : एकूण
रामनवमी (दि. २६) : ३६८ : १७१२४७७० : ३०१४४१५ : २०१३९१८५
शुक्रवार (दि.२७) : ५७५ : २६४५५४६० : ४६०१५९० : ३१०५७०५०
शनिवार (दि.२८) : ४२२ : २०२२९८८० : ३०१३५४० : २३२४३४२०
रविवार (दि.२९) : २९१ : २०५२७२६५ : ३०५६२२० : २३५८३४८५
सोमवार (दि.३०) : ४३२ : १९५७०३०० : ३६१५८९० : २३१८५१९०
मंगळवार (दि.३१) : ३३२ : १८६३१०८७ : २८५४२९० : २१४८५३७७
एकूण : २ हजार ४२० : १२ कोटी २५ लाख ३८ हजार ७६२ : २ कोटी १ लाख ५४ हजार ९४५ : १४ कोटी २६ लाख ९३ हजार ७०७

सन : उद्दिष्ट : दस्तसंख्या : जमा महसूल : टक्केवारी
२०२४-२५ : ६४० कोटी : ८८ हजार ५८१ : ५४१.७७९१ : ८४.६५ टक्के
२०२५-२६ : ६७० कोटी : ९८ हजार ७२२ : ५६७.३१०४ : ८४.६७ टक्के

Web Title : कोल्हापुर में 99,000 दस्तावेज़, स्टाम्प शुल्क से करोड़ों की कमाई।

Web Summary : कोल्हापुर के स्टाम्प विभाग ने वित्तीय वर्ष 2025-26 में ₹568 करोड़ का राजस्व अर्जित किया। लगभग 99,000 दस्तावेज़ पंजीकृत किए गए। विभाग ने अपने ₹670 करोड़ के राजस्व लक्ष्य का 85% हासिल किया। स्टाम्प कार्यालय जिले की अर्थव्यवस्था के लिए महत्वपूर्ण हैं।

Web Title : Kolhapur Records 99,000 Deeds, Earns Crores in Stamp Duty.

Web Summary : Kolhapur's stamp department earned ₹568 crores in revenue during fiscal year 2025-26. Approximately 99,000 documents were registered. The department achieved 85% of its ₹670 crore revenue target. Stamp offices are crucial for the district's economy.