शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: आठ तोळे दागिन्यांवर एसटी चालकानेच मारला डल्ला, सातारा जिल्ह्यातील चालकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 11:49 IST

चालकाची लबाडी उघडकीस आली

कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानकात पोहोचलेल्या एसटीचा किरकोळ मेन्टनन्स करण्याच्या निमित्ताने प्रवाशांना खाली उतरवून एसटी वर्कशॉपकडे घेऊन गेलेल्या चालकाने सीटवरील पर्समधील अडीच लाखांचे आठ तोळे दागिने लंपास केले. हा प्रकार सोमवारी (दि. २५) पहाटे साडेतीनच्या सुमारास घडला.याबाबत राजश्री आनंदा नलवडे (वय ४०, सध्या रा. ठाणे, मूळ रा. राशिंग, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) यांनी फिर्याद देताच पोलिसांनी चार तासांत छडा लावून दागिने चोरणाऱ्या एसटी चालकास अटक केली. सुधीर लक्ष्मण शिंदे (वय ४२, रा. समर्थगाव, पोस्ट अतित, जि. सातारा) असे अटकेतील चालकाचे नाव आहे.शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ठाण्याहून सुटलेली एसटी सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानकात पोहोचली. पुढे बेळगावला जाण्यापूर्वी चालक सुधीर शिंदे याने एसटीचा किरकोळ मेन्टनन्स करण्याचे कारण सांगून सर्व प्रवाशांना खाली उतरवले. त्यानंतर वर्कशॉपच्या दिशेला जाऊन काही वेळाने ते परत आले.एसटीत बसताच फिर्यादी राजश्री नलवडे यांनी पर्स तपासली. त्यावेळी पर्समधील दागिन्यांची एक डबी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी एसटी थांबवून पोलिसांना बोलवले. बसची झडती घेण्याची विनंती केली. सोन्याचा हार, कुड्या, वेल, कानातील दागिने अशा आठ तोळे दागिन्यांची चोरी झाल्याची फिर्याद दिली.चालकाची लबाडी उघडकीस आलीपोलिसांनी एसटीतील प्रवासी आणि वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. वर्कशॉपमध्ये एसटी पोहोचल्याच्या नोंदी मिळाल्या नाहीत. कर्मचाऱ्यांनी एसटी दुरुस्तीचे काही कामही केले नव्हते. चालकाकडे चौकशी केल्यावर त्याच्या बोलण्यात विसंगती आली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पर्समधील दागिन्यांची डबी चोरल्याची कबुली दिली. या सर्व प्रकारात प्रवाशांचा मात्र खोळंबा झाला. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची पोलिस कोठडीत रवानगी झाली. त्याने यापूर्वीही अशा प्रकारे चोऱ्या केल्या असाव्यात, असा पोलिसांचा अंदाज आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस