शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आजऱ्यात क्रीडासंकुल उभारणार

By admin | Updated: December 9, 2014 23:17 IST

नवनाथ फडतारे : १० जानेवारीपासून कामास सुरुवात

आजरा : आजरा शहरामध्ये एक कोटी रुपये खर्च करून होणारे क्रीडासंकुल हे संपूर्ण जिल्ह्यात आदर्शवत ठरेल. या क्रीडासंकुलाच्या जागेवर असणारी झाडे व विद्युत खांब हलविण्याबाबत संबंधितांना सूचना केल्या असून, १० जानेवारीपासून क्रीडासंकुलाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल, अशी माहिती जिल्हा क्रीडाधिकारी नवनाथ फडतारे यांनी दिली.आजरा येथील मंजूर क्रीडासंकुलाच्या उभारणीच्या हालचाली गतिमान झाल्या असून, या पार्श्वभूमीवर आजरा तहसील कार्यालयात तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.फडतारे म्हणाले, मंजूर एक कोटी रुपयांपैकी ८७ लाख रुपये जिल्हा क्रीडा विभागाकडे जमा झाले आहेत. मंजूर एक कोटी रुपयांबरोबरच राजीव गांधी खेल अभियानांतर्गत आणखी एककोटी रुपयांचा निधी मंजूर होऊ शकतो. सदर संकुलामध्ये बहुउद्देशीय सभागृह, रनिंग ट्रॅक, वेगवेगळ्या खेळांसाठी वेगवेगळी मैदाने तयार करण्यात येणार आहेत. सर्वसोयींनी युक्तअसे आदर्श क्रीडासंकुल उभारण्यास प्रयत्नशील आहोत.फडतारे यांनी भूमी अभिलेख विभागाने सदर संकुलासाठी निश्चित केलेल्या जागेचे मोजमाप करून वनखात्याला तातडीने कळवावे. वनखात्याने सदर जागेतील वृक्षांची मोजणी करून ती तोडून लिलाव पद्धतीने विक्री करावी. त्याचबरोबर वीज वितरण कंपनीने या जागेवरून जाणाऱ्या वीज वाहिन्या हलविण्याच्या सूचना केल्या. संकुल उभारण्यासाठी ‘महसूल’ विभागाकडून सर्वप्रकारचे सहाय केले जाईल, असे आश्वासन तहसीलदार ठोकडे यांनी दिले.तालुका कृषी अधिकारी श्रीकांत निकम, परिक्षेत्र वनअधिकारी राजन देसाई, वीज कंपनीचे अभियंता सिकनीस, मंडल अधिकारी म्हाळसाकांत देसाई, बांधकामचे नवखंडकर, भूमी अभिलेखचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)