मनीषा दुबुले, संजीव झाडे यांना विशेष पदक जाहीर; कोल्हापुरातील १७ पोलिसांना विशेष पोलिस महासंचालक पदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 11:38 IST2025-04-29T11:38:06+5:302025-04-29T11:38:24+5:30

कोल्हापूर : राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीआयडी कोल्हापूरच्या अधीक्षक मनीषा दुबुले, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे ...

Special medals announced for Manisha Dubule, Sanjeev Zade from Kolhapur; 17 policemen to get special Director General of Police medals | मनीषा दुबुले, संजीव झाडे यांना विशेष पदक जाहीर; कोल्हापुरातील १७ पोलिसांना विशेष पोलिस महासंचालक पदक

मनीषा दुबुले, संजीव झाडे यांना विशेष पदक जाहीर; कोल्हापुरातील १७ पोलिसांना विशेष पोलिस महासंचालक पदक

कोल्हापूर : राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीआयडी कोल्हापूरच्या अधीक्षक मनीषा दुबुले, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह जिल्ह्यातील १७ पोलिसांना विशेष पोलिस महासंचालक पदक जाहीर झाले. गेल्या वर्षभरात सेवेत उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सोमवारी (दि. २८) राज्यातील ८०० पोलिसांना पदक जाहीर केले.

मनीषा भीमराव दुबुले- पोलिस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), संजीवकुमार दत्तात्रय झाडे पोलिस निरीक्षक (जुना राजवाडा पोलिस ठाणे), रविराज अनिल फडणीस (पोलिस निरीक्षक), पोलिस उपनिरीक्षक जालिंदर अंकुश जाधव, नरसू भारमाना गावडे, महादेव नारायण कुराडे, अनिल संभाजी जाधव, जनार्दन शिवाजी खाडे

पोलिस हवालदार संजय दिनकर कुंभार, राजू रामचंद्र पट्टणकुडे, अरुण रवींद्र खोत, सागर जगन्नाथ चौगुले, हिंदुराव रामचंद्र केसरे, अनुराधा देवदास पाटील, रमेश श्रीपती काबंळे, युवराज भिवाजी पाटील, पोलिस शिपाई संग्राम पांडुरंग पाटील अशी पदकप्राप्त अधिकारी आणि अंमलदारांची नावे आहेत.

Web Title: Special medals announced for Manisha Dubule, Sanjeev Zade from Kolhapur; 17 policemen to get special Director General of Police medals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.