दक्षिण युवक काँग्रेस राबविणार अभिनव उपक्रम
By Admin | Updated: July 14, 2014 01:00 IST2014-07-14T00:40:51+5:302014-07-14T01:00:13+5:30
‘चलो स्कूल.... चलो कॉलेज !’

दक्षिण युवक काँग्रेस राबविणार अभिनव उपक्रम
कणेरी : शंभर टक्के मुले-मुली शाळेमध्ये शंभर टक्के युवक-युवती कॉलेजमध्ये हा उपक्रम कोल्हापूर दक्षिण युवक कॉँग्रेसमार्फत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर दक्षिण युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष उत्तम आंबवडे पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या उपक्रमात पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ घेता येईल. आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना या उपक्रमातून शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. ज्या विद्यार्थ्याला शिक्षण घ्यायचे आहे परंतु तो शिक्षण घेऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या अडचणी समजून त्यांना योग्यरित्या मार्गदर्शन करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी साकारणार आहे, असे ते म्हणाले.
या उपक्रमांतर्गत प्रत्येक कॉलेज, शाळेत जाऊन शाळेत न येणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे व पत्ते घेऊन त्यांच्याशी संपर्क साधून तसेच विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन योग्य त्या विद्यार्थ्यांना शाळेत, कॉलेजमध्ये जाण्यासाठी त्यांच्या गरजेनुसार योग्य ती मदत केली जाणार आहे.
गरजू विद्यार्थ्यांनी अजिंक्यतारा कार्यालय, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेस अखिल भारतीय युवक कॉँग्रेस-कोल्हापूर दक्षिण विधानसभा कमिटीचे जनरल सेक्रेटरी जितेंद्र यशवंत, उपाध्यक्ष अभिजित देठे, विश्वजित बकरे, अशोक पाटील, सागर राणे आदी उपस्थित होते.