शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
4
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
5
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
6
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
7
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
8
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
9
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
10
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
11
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
12
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
13
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
14
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
15
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
16
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
17
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
18
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
19
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
20
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

नव्या निपाणी तालुक्याची लवकरच घोषणा

By admin | Updated: October 17, 2014 00:52 IST

काकासाहेब पाटील यांची माहिती : अर्थसंकल्पापर्यंत शक्य

निपाणी : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची बंगलोर येथे भेट घेऊन निपाणी तालुका निर्मितीची गरज स्पष्ट केली होती. त्यानुसार या प्रक्रियेला आता गती आली असून, दि. १ नोव्हेंबर ते अर्थसंकल्पापर्यंत त्याची घोषणा होणार असल्याची माहिती माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी दिली. निपाणी येथे आज, गुरुवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काकासाहेब पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या भेटीवेळी आपणासह आमदार वीरकुमार पाटील यांनी या विषयावर सविस्तर चर्चा केली होती. नव्या निपाणी तालुक्यात निपाणी, कोगनोळी, जत्राट, लखनापूर, पडलिहाळ, शिरगुप्पी, कोडणी, शेंडूर, गोंदुकुप्पी, सौंदलगा, हंचिनाळ, कुर्ली, यरनाळ, गवाणी, तवंदी, आप्पाचीवाडी, अकोळ, पागिंरे बी, बुधलमुख, यमगर्णी, नांगनूर, बुद्धिहाळ, बेनाडी, मत्तिवडे, हदनाळ, भाटनांगनूर, आदी गावांसह ५४ गावांचा सभावेश आहे. वरील गावांपैकी आडी, लखनापूर, पट्टणकुडी, खडकलाट, नवलिहाळ आणि निपाणी नगरपालिकेने तालुका निर्मितीसाठीचा ठराव केलेला नाही. त्या ग्रामपंचायतींनी तत्काळ ठराव करून २७ आॅक्टोबरपूर्वी तालुका कार्यालयात पोहोच करण्याचे आवाहन पाटील यांनी केले. सुरुवातीपासूनच निपाणी तालुक्यासाठी आपण पाठपुरावा केला होता. आता नव्या तालुक्याची घोषणा झाल्यानंतर त्याचा सर्वांना लाभ होणार असल्याचे काकासाहेब पाटील यांनी सांगितले.यावेळी निपाणी भाग कॉँग्रेस कमिटी अध्यक्ष गोपाळ नाईक, बेडकीहाळ भाग कॉँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रदीप जाधव, पंकज पाटील, सुजय पाटील, राकेश कदम, बाबूराव खोत, राज पठाण, अशोक असोदे, प्रवीण भाटले, सुनील पाटील, राजेंद्र चव्हाण, धनाजी निर्मळे, रघुनाथ चौगुले, बंडा पाटील, चेतन स्वामी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)हुक्केरी तालुक्यातील शिप्पूर, नांगनूर, हिटणी, कणगला, करजगा, हरगापूर, सोलापूर, कोनकेरी, बुगटे अल्लूर, हडलगा, शेकीन हसूर, मत्तवाड, भैरापूर, राशिंग आणि व्हन्नोळी ही गावे एम. बी. प्रकाश कमिटीप्रमाणे निपाणी तालुक्यात येऊ शकतात. त्यासाठी या ग्रामपंचायतीनीही तत्काळ ठराव करून जिल्हाधिकारी कार्यालयास पोहोचविण्याचे आवाहन माजी आमदार पाटील यांनी केले.