शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: आईने कॉलेजला का गेला नाहीस म्हणून विचारले, रागात मुलाने टोकाचे पाऊल उचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 13:51 IST

पोलिस बनण्याचे स्वप्न राहिले अधुरे

गडहिंग्लज : आईने ‘आज तू कॉलेजला का गेला नाहीस’? असे विचारल्याचा राग मनात धरून त्याने राहत्या घराच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमधील लाकडी तुळईला दोरीने गळफास घेतला. ओंकार बाबू कांबळे (वय १९, कुंबळहाळ, ता. गडहिंग्लज) असे मृताचे नाव आहे.पोलिस व ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी, कुंबळहाळ येथील बापू काडाप्पा कांबळे यांचा मुलगा ओंकार हा चिंचेवाडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात पदविका प्रथम वर्षात शिकत होता. अलिकडे दोन-चार दिवस तो कॉलेजला जात नव्हता. त्यामुळे कॉलेजला का जात नाहीस, अभ्यास कर, असे आईने त्याला सांगितले होते.मंगळवारी (१०) सकाळी आई-वडील दोघेही नेहमीप्रमाणे कामाला गेले होते. लहान भाऊ कॉलेजला गेल्यामुळे तो घरी एकटाच होता. घरी कुणी नसल्याचे पाहून त्याने घराच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये लाकडी तुळईला दोरीने गळफास घेतला.दरम्यान, शेळ्यांना चारा टाकण्यासाठी आई माला शेडमध्ये गेल्या असता, त्यांना ओंकारने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. वडील बाबू कांबळे यांच्या वर्दीवरून घटनेची नोंद झाली आहे.पोलिस बनण्याचे स्वप्न राहिले अधुरेओंकारचे वडील बाबू हे हलकर्णी येथील लाकडाच्या वखारीत मजुरी तर आई माला या शेतमजुरी करतात. बारावीनंतर तो अभियांत्रिकी पदविकेच्या पहिल्या वर्षात शिकत होता. दरम्यान, पोलिस भरतीसाठीही त्याचे प्रयत्न सुरू होते. परंतु, किरकोळ कारणावरून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याने त्याच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Son takes drastic step after mother questions college absence.

Web Summary : Upset after his mother questioned his absence from college, a 19-year-old student in Kumbhalhal, Gadhinglaj, tragically ended his life by hanging himself. The incident has left the family and community in shock.