शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

कोल्हापुरात काँग्रेस, भाजपला धक्का; शारंगधर देशमुखांसोबत कोण..कोण?, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:11 IST

१२ ते १५ जण येणार असल्याचा दावा

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या असून आज, मंगळवारी कोल्हापुरातील काँग्रेसचे शारंगधर देशमुख यांच्यासह काही माजी नगरसेवक शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत. हा पक्ष प्रवेशाचा समारंभ मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तागिरी या शासकीय निवासस्थानी पार पडणार आहे. देशमुख व सत्यजित कदम यांचे समर्थक असलेले साधारणपणे १२ ते १५ माजी नगरसेवक शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा केला जात आहे. परंतु कोण कोण प्रवेश करणार याबाबत मात्र गोपनियता पाळण्यात आली आहे. त्यामुळे उत्सुकता वाढून राहिली आहे.शारंगधर देशमुख हे एकेकाळचे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक होते. दहा वर्षे त्यांच्याकडे काँग्रेसचे गटनेते पद देऊन आघाडी सांभाळण्याचे काम त्यांनी त्यांच्यावर सोपविले होते. त्यामुळे देशमुख यांनी काँग्रेसची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश करणे म्हणजे आमदार सतेज पाटील यांना धक्का मानला जातो. त्यांची कोल्हापूर दक्षिणमधील कारभाराची सुत्रे देशमुख सांभाळत होते.सत्यजित कदम यांनीही ताराराणी आघाडीचे गट नेतेपद सांभाळले होते. या आघाडीची महापालिकेत भाजपबरोबर युती झाली होती परंतु महाडिक यांचे जवळचे नातेवाईक असलेल्या कदम यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने तसेच कदम समर्थक माजी नगरसेवक प्रवेश करणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांनाही हा धक्का मानला जात आहे.महापालिकेतील ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर माजी नगरसेवक रमेश पुरेकर यांनी आठ दिवसांपूर्वी प्रवेश केला. त्यानंतर आता आज, मंगळवारी काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते व स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांच्यासह काही नगरसेवक शिंदेसेनेत प्रवेश करतील. या पक्षप्रवेश समारंभास पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित कदम उपस्थित राहणार आहेत.