Kolhapur: पुरात वाहून निघालेल्या वृद्धास सैनिकाने वाचले -video
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 18:25 IST2025-07-30T18:24:46+5:302025-07-30T18:25:05+5:30
नदीच्या काठावरील एका झाडाच्या फांदीला धरून वाचवण्यासाठी आवाज देत होते

Kolhapur: पुरात वाहून निघालेल्या वृद्धास सैनिकाने वाचले -video
सिद्धनेर्ली : दूधगंगा नदीच्या पुरात वाहून जाणाऱ्या वयोवृद्धाला बामणी येथील जवान सूरज चंद्रकांत पाटील यांनी जीव धोक्यात घालून वाचवले.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी : सिद्धनेर्ली येथील बंडा गणपती कांबळे हे दुपारी बाराच्या दरम्यान हातपाय धुण्यासाठी दूधगंगा नदीकिनाऱ्यावरील नदीच्या पात्रात गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने व अचानक तोल गेल्याने ते पाण्यात पडून प्रवाहाबरोबर वाहत गेले. अंदाजे पाचशे फुटांवर गेल्यानंतर त्यांना नदीच्या काठावरील एका झाडाच्या फांदीचा आधार मिळाला. तिथेच ते दोन तास फांदी धरून राहिले. तेथूनच वाचवण्यासाठी आवाज देत होते.
येथून जात असणारे बामणी येथील जवान सूरज चंद्रकांत पाटील यांनी जीव धोक्यात घालून तत्काळ प्रवाहात उडी घेतली व त्यांच्यापर्यंत पोहोचत त्यांना आधार दिला. बराच वेळ पाण्यात झाडाला लटकत असल्याने बंडा कांबळे अंग थरथरत होते. त्यांना त्यांनी धीर देत बाहेर काढले.