सोलापूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी आर. के. कामत, आज स्वीकारणार पदभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 13:59 IST2023-05-05T13:59:12+5:302023-05-05T13:59:37+5:30

कोल्हापूरचे असणारे डॉ.आर.के. कामत सध्या डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत

Solapur University Vice Chancellor R. K. Kamat | सोलापूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी आर. के. कामत, आज स्वीकारणार पदभार

सोलापूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी आर. के. कामत, आज स्वीकारणार पदभार

कोल्हापूर : सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी मूळचे कोल्हापूरचे असणारे डॉ.आर.के. कामत यांची निवड करण्यात आली. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी ही नियुक्ती केली आहे. डॉ. कामत सध्या डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. 

सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणीस यांचा कार्यकाल आज शुक्रवारी (दि. ५) पूर्ण होत आहे. त्यामुळे नवीन कुलगुरूंची निवड होईपर्यंत या पदाचा कार्यभार डॉ. कामत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आज, शुक्रवारी कामत हे पदभार स्वीकारणार आहेत.

डॉ. कामत यांनी यापूर्वी शिवाजी विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता, विविध अधिकार मंडळाचे सदस्य, इलेक्ट्रॉनिक्स्, संगणक शास्त्र विभागाचे विभागप्रमुख म्हणून काम पाहिले आहे. ते ऑस्ट्रोलियातील विकटोरियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील मानद प्राध्यापक आहेत.



सोलापूर विद्यापीठात नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी मी प्रयत्लशील राहणार आहे. कुलपतींनी दाखविलेल्या विश्वासाबद्धल त्यांचे आभार. - आर.के. कामत, प्रभारी कुलगुरु, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

Web Title: Solapur University Vice Chancellor R. K. Kamat