शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

सोकाजीराव टांगमारे पुन्हा रंगभूमीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 12:10 PM

Natak Kolhapur Pune- आठ वर्षांपूर्वी देशभर तब्बल २५० हाऊसफुल्ल प्रयोग करून कोल्हापूरच्या कलाकारांची व्यावसायिक नाट्यपरंपरेची नव्याने ओळख करून देणारे सोकाजीराव टांगमारे हे लोकनाट्य बाजाचे विनोदी नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. शनिवारी (दि. १३ ) पुण्यातील बालगंधर्व नाट्यमंदिरात, तर दि. २१ रोजी कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहात हे नाटक नव्या ढंगात, नव्या रूपात नाट्यप्रेमींच्या भेटीला येत आहे.

ठळक मुद्देसोकाजीराव टांगमारे पुन्हा रंगभूमीवर केशवराव भोसले नाट्यगृहात २१ ला प्रयोग

कोल्हापूर : आठ वर्षांपूर्वी देशभर तब्बल २५० हाऊसफुल्ल प्रयोग करून कोल्हापूरच्या कलाकारांची व्यावसायिक नाट्यपरंपरेची नव्याने ओळख करून देणारे सोकाजीराव टांगमारे हे लोकनाट्य बाजाचे विनोदी नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. शनिवारी (दि. १३ ) पुण्यातील बालगंधर्व नाट्यमंदिरात, तर दि. २१ रोजी कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहात हे नाटक नव्या ढंगात, नव्या रूपात नाट्यप्रेमींच्या भेटीला येत आहे.मित्राय प्रॉडक्शनचे स्वप्निल यादव, कलाकार संजय मोहिते, राजश्री खटावकर, अमोल नाईक यांनी गुरुवारी कोल्हापुरात पत्रकार बैठकीत नाटकाच्या पुनरागमनाची घोषणा केली. कथालेखक द. मा. मिरासदार यांच्या व्यंगात्मक लेखणीतून १९६५ मध्ये मी तुमची लाडाची मैना या नावाने लोकनाट्यवजा वगनाट्य लिहिले. या कथेवर निळू फुले, उषा नाईक यांच्यासह दिग्गज कलाकारांनी लाडाची मैना नावाचे नाटक केले. ते तुफान चालले.

पुढे हे नाटक व्यावसायिक समीकरणात बसविण्याचा विचार झाला, त्याचा अभ्यास होऊन जानेवारी २००७ मध्ये सोकाजीराव टांगमारे या नावाने नाटक कोल्हापुरात सादर झाले. संजय मोहिते यांची प्रमुख भूमिका असलेल्या या नाटकाने तुफान प्रसिद्धी मिळवत कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.२००७ पासून २०१२ पर्यंत संपूर्ण राज्यासह कर्नाटक, गोव्यातही या नाटकाचे प्रयोग लोकांनी डोक्यावर घेतले. या नाटकाने २०० प्रयोगाचा टप्पा पार केला. त्यानंतर मात्र काही अडचणीमुळे हे नाटक थांबले.

आता कोरोनानंतरच्या जगाचे संदर्भ, राजकीय शेरेबाजी, घोटाळे असे संदर्भ घेत कौटुंबिकतेतून सामाजिक व्यंगावर भाष्य करत हसता हसता अंतर्मुख करायला लावणारे हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर येत आहे. पुण्यातील प्रयोगाला ९४ वर्षीय द. मा. मिरासदार स्वत: उपस्थित राहणार आहेत. कोल्हापुरातील प्रयोग स्थानिक कलाकारांच्याच उपस्थितीत होत आहे. त्याचे बुकिंग १८ पासून सुरू होत आहे.कोल्हापूूरकरांनो, लोकाश्रय द्यानाटकाला राजाश्रय उरला नाही. आता लोकाश्रयच कलाकारांना प्रोत्साहन देऊ शकतो. कोल्हापूरच्या मातीत तयार झालेले हे नाटक असे फिनिक्स भरारी घेण्यासाठी कोल्हापूरकरांचे सहकार्य हवे, अशी अपेक्षा या नाटकातील कलाकारांनी व्यक्त केली.

टॅग्स :Natakनाटकkolhapurकोल्हापूरPuneपुणे