शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

प्रेमाचे वादळी वारे.. बालविवाहाचे नगारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2021 12:45 PM

फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरून त्यांचा संपर्क होतो.. बोलणे वाढत जाते.. त्यातून प्रेम जुळते व एकदिवस मुलगी घरातून बेपत्ता होते..

विश्वास पाटील

कोल्हापूर : मुलगी साताऱ्याची.. मुलगा पन्हाळ्याचा..फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरून त्यांचा संपर्क होतो.. बोलणे वाढत जाते.. त्यातून प्रेम जुळते व एकदिवस मुलगी घरातून बेपत्ता होते.. अशा घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पळून गेलेली मुलगी माझे त्याच्यावर प्रेम आहे.. लग्न करा नाहीतर मी आत्महत्या करणार अशी धमकी देते. जिवाचे काही बरेवाईट करून घेण्यापेक्षा लग्न लावून दिलेले बरे या मानसिकतेतून पालक मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही तिचा विवाह करत असल्याचे चित्र समाजात दिसत आहे.ज्या प्रथेला प्रतिबंध घालण्यासाठी शासन व समाजही अनेक वर्षे झगडत आहे, त्याच बालविवाहास सोशल मीडियामुळे नवे खतपाणी मिळत आहे. नवमाध्यमांचाही हा सामाजिक तोटा आहे. वडणगे (ता. करवीर) येथे मंगळवारी बालविवाह रोखल्यानंतर त्याचे स्वरूप किती गंभीर आहे हे ‘लोकमत’ने जाणून घेतले. लॉकडाऊन व त्यानंतरच्या काळातही बालविवाहाच्या घटना वाढल्याचे निरीक्षण अवनि संस्थेच्या जागर प्रकल्पाचे समन्वयक प्रमोद पाटील यांनी नोंदवले. गेल्या सहा महिन्यांत त्यांच्या संस्थेकडे किमान ६० कॉल आले. त्यातील ३० विवाह रोखण्यात संस्थेला यश आले आहे; परंतु विवाह होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे वास्तव दिसते.

डॉक्टर काय म्हणतात...

डॉ. नीता कुडाळकर यांनी सांगितले की, अठरा वर्षे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मुलीची मानसिक व शारीरिक वाढ पूर्णत: झालेली नसते. तिचे व्यक्तिमत्त्व माणूस म्हणून फुललेले नसते. तोपर्यंत लग्न झाल्यास शारीरिक व मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशातच तिच्या नशिबी बाळंतपण येते. ज्यामध्ये तिच्या स्वत:च्या जिवालाही धोका असतो. जन्माला येणारे बाळही तितकेसे निरोगी नसते. बाळाची जबाबदारी घ्यायला आईही सक्षम नसते. त्याचा मुलाच्या संगोपनावर परिणाम होतो. गरोदरपणात अनेक महिलांना रक्तदाबाचा त्रास असतो; परंतु मुलगी अल्पवयीन असल्यास हा त्रास जास्त होऊ शकतो.

मागील तीन वर्षांत बेपत्ता झालेल्या मुलींची जिल्ह्यातील स्थिती अशी

 

 

वर्ष एकूण बेपत्ता परत आल्या

 

 

२०१९ - २४१ - १८३

२०२० - १२६ - १२३

२०२१ - १९८ - १४४

बालविवाह होत असल्याचे समजल्यास कुणाला फोन कराल..

बालविवाह रोखण्यासाठी कोल्हापुरातील अवनि संस्थेतर्फे महानायक अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या मदतीतून जागर प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्याचे समन्वयक प्रमोद पाटील (मो-७९७२३१५४१८) आहेत. त्यांच्याशी संपर्क साधता येईल. चाइल्ड लाइनचा टोल फ्री क्रमांक १०९८ असून, त्यांच्या प्रतिनिधी अनुजा खुरंदळ-९०२८८२७४८९ यांच्याशी संपर्क साधता येईल. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाते. पोलीस प्रशासनाच्या १०० नंबरवरही ही माहिती देता येऊ शकते.

शिक्षा काय होते..

बालविवाह केल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित नवऱ्या मुलावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा नोंद होतो. त्याशिवाय बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अन्वये नवरा, त्याचे कुटुंबीय, लग्नाला उपस्थित पाहुणे, भटजी, लग्नातील म्होरके, आचारी, फोटोग्राफरसह मंगल कार्यालय मालक व मित्रमंडळी यांनाही प्रत्येकी १ लाखाचा दंड व २ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा होवू शकते.

ग्रामसमित्याच नाहीत..

बालविवाह रोखण्यासाठी गाव पातळीवर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम बालसंरक्षण समिती व शहरात वॉर्ड समित्या स्थापन करण्याचे २०१४ चे शासन आदेश आहेत; परंतु बहुतांशी गावात व शहरातही या समित्यांची स्थापनाच झालेली नाही. बालविवाह होत असल्याचे समजल्यास या समितीचा अध्यक्ष म्हणून सरपंच किंवा ग्रामसेवक यांची त्याबद्दल कळवण्याची व तो रोखण्याची जबाबदारी असते; परंतु स्थानिक राजकारण, कुणाचे वाकडे घ्यायला नको म्हणून हा विवाह लपवून ठेवण्याकडेच कल असतो, असे अनुभव आहेत.

बालग्राम समित्या सक्षम झाल्यास त्यातून बालविवाह, पोस्कोसारखे गुन्हे, मुलींचे कुटुंबात होणारे शोषण अशा घटना रोखणे शक्य आहे. त्यासाठीचे प्रशिक्षण आवश्यक आहे. - ॲड. दिलशाद मुजावर, सदस्या, बाल कल्याण समिती, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarriageलग्नSocial Mediaसोशल मीडियाLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट