..तर मुख्यमंत्री ठाकरे, पवार यांच्या दारात उपोषण,प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 11:11 IST2021-07-20T10:47:55+5:302021-07-20T11:11:05+5:30

Sugar factory Labour Gadhinglaj Kolhpaur : सेवानिवृत्त कामगारांनी ग्रॅच्युईटी व इतर थकित देणी मिळवून द्यावी, अन्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या दारात उपोषणाला बसू, असा इशारा आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगार संघटनेतर्फे प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

..So fast at the door of Chief Minister Thackeray, Pawar | ..तर मुख्यमंत्री ठाकरे, पवार यांच्या दारात उपोषण,प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

गडहिंग्लज येथे सेवानिवृत्त साखर कामगार संघटनेतर्फे प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी चंद्रकांत बंदी, सुरेश पाटील, रणजीत देसाई आदी उपस्थित होते.

ठळक मुद्दे..तर मुख्यमंत्री ठाकरे, पवार यांच्या दारात उपोषण,प्रांताधिकाऱ्यांना निवेदन गडहिंग्लज कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांचा इशारा

गडहिंग्लज : २६ जुलैपर्यंत गडहिंग्लज कारखाना व ब्रिस्क कंपनी आणि कामगार संघटनेची संयुक्त बैठक बोलवून सेवानिवृत्त कामगारांनी ग्रॅच्युईटी व इतर थकित देणी मिळवून द्यावी, अन्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या दारात उपोषणाला बसू, असा इशारा आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगार संघटनेतर्फे प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

प्रांताधिकारी विजया पांगारकर यांची शिष्टमंडळाने भेट घेवून हे निवेदन देण्यात आले. कोरोनाचे कारण पुढे करून कामगारांना धरणे आंदोलनापासून परावृत्त करण्यात येत असल्याचा आरोपही संघटनेने निवेदनातून प्रशासनावर केला आहे.

निवेदनात म्हटले आहे, औद्योगिक न्यायालयाचा निकाल कामगारांच्या बाजूने लागूनदेखील कारखाना व ब्रिस्क कंपनी आपल्या सोयीनुसार अर्थ काढून कामगारांची देणी देण्यास टाळाटाळ करीत आहेत.

आजअखेर सुमारे ३५० कामगार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यापैकी ६०-७० कामगारांचे निधन झाले असून २५-३० कामगार आजारपणामुळे अंथरूणावर खिळून आहेत. त्यामुळे कायद्यानुसार देय असलेली ग्रॅच्युईटी व थकित देणी सेवानिवृत्तांना मिळवून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

शिष्टमंडळात चंद्रकांत बंदी, रणजीत देसाई, सुभाष पाटील, लक्ष्मण देवार्डे, बाळासाहेब लोंढे, सुरेश पाटील, महादेव मांगले यांचा समावेश होता.

 

Web Title: ..So fast at the door of Chief Minister Thackeray, Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.