धामोड परिसरात परतीच्या पावसाचे धुमशान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 16:42 IST2020-10-20T16:39:33+5:302020-10-20T16:42:19+5:30
rain, dhamod, kolhapur, farmar दुपारी एक वाजता अचानक सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटाने चांगलीच धडकी भरली होती.

धामोड( ता. राधानगरी) येथे परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. (छाया-श्रीकांत ऱ्हायकर)
धामोड- दुपारी एक वाजता अचानक सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटाने चांगलीच धडकी भरली होती.
अचानक सुरू झालेल्या पावसाने भात कापणी व मळणीच्या कामात मोठे अडथळे निर्माण झाले .४५ मिनीटे एक सारखा हा पाऊस कोसळत होता . या ४५ मिनीटात धामोड परिसरात विक्रमी १००मिली मीटर इतका पाऊस झाला.
या परतीच्या पावसाने भात पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक सुरू झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. रस्त्यावर घाललेल्या भात मळण्यांचे तर मोठा नुकसान झाले. दरम्यान तुळशी धरणाच्या पाणी पातळीत ही मोठी वाढ झाल्याने धरणातून ७५० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले.