शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

चिल्लर पार्टी, इला फौंडेशनतर्फे शाळांमध्ये घुबडांविषयी स्लाईड शो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 4:31 PM

घुबडांविषयी अंधश्रध्दा दूर करणे तसेच घुबडांच्या संरक्षण व संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी कोल्हापूरातील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीने पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देचिल्लर पार्टी, इला फौंडेशनतर्फे शाळांमध्ये घुबडांविषयी स्लाईड शोघुबडांच्या संरक्षण व संवर्धनासाठी जनजागृती

कोल्हापूर : घुबडांविषयी अंधश्रध्दा दूर करणे तसेच घुबडांच्या संरक्षण व संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी कोल्हापूरातील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीने पुढाकार घेतला आहे. इला फौंडेशनच्या सहकार्याने आॅक्टोबर महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये घुबडांविषयी माहिती देणारे स्लाईड शो आयोजित करण्यात आले आहेत.भारतात घुबडांच्या ४0 प्रजाती आहेत. त्यापैकी ९ जाती या केवळ भारतातच आहेत. शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या घुबडांना केवळ अंधश्रध्देमुळे मोठ्या प्रमाणात मारले जाते. ट्रॅफिक या संस्थेच्या २0१४ सालच्या अहवालात देशात वर्षाला ७८ हजार घुबडे मारली जात असल्याचा उल्लेख आहे.

या पार्श्वभूमीवर पुण्यात इला फौंडेशनमार्फत नोव्हेंबर २0१९ मध्ये देशातील पहिली आंतरराष्ट्रीय घुबड परिषद होणार आहे. या परिषदेत ४२ देश सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जेजुरीजवळ २९ व ३0 नोव्हेंबर २0१८ रोजी भारतीय उलूक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ आणि इला फौंडेशन यांच्या माध्यमातून घुबडांविषयी अंधश्रध्दा दूर करणे व संवर्धन-संरक्षणासाठी माहितीपट व स्लाईड शोच्या माध्यमातून आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील ५0 शाळांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.या उपक्रमाचा प्रारंभ ३0 सप्टेंबर रोजी शाहू स्मारक भवन येथे होणार आहे. तत्पूर्वी चिल्लर पार्टीतर्फे मुलांसाठी दर महिन्याला दाखविण्यात येणाऱ्या चित्रपट उपक्रमात सकाळी १0 वाजता द लिजंड आॅफ गार्डियन्स हा चित्रपट विनामूल्य दाखविण्यात येणार आहे.

याच कार्यक्रमात घुबडांविषयीचा माहितीपट दाखविण्यात येणार असून इला संस्थेचे प्रतिनिधी मुलांशी संवाद साधणार आहेत. हा उपक्रमांतर्गत ज्या शाळांना सहभागी व्हायचे आहे, त्यांनी या उपक्रमाच्या चिल्लर पार्टीच्या समन्वयक शिवप्रभा लाड आणि इला फौंडेशनचे कोल्हापूर प्रतिनिधी बंडा पेडणेकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन चिल्लर पार्टीतर्फे करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :environmentवातावरणkolhapurकोल्हापूर