शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात उद्या मूक आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:33 IST

मराठा आरक्षणासाठी समाजातील समन्वयकांची मते, सूचना जाणून घेऊन खासदार संभाजीराजे यांनी १६ जूनपासून कोल्हापुरातून मूक आंदोलन करण्याची घोषणा गुरुवारी ...

मराठा आरक्षणासाठी समाजातील समन्वयकांची मते, सूचना जाणून घेऊन खासदार संभाजीराजे यांनी १६ जूनपासून कोल्हापुरातून मूक आंदोलन करण्याची घोषणा गुरुवारी केली. त्याला या समन्वयकांनी पाठिंबा दिला. गेल्या दोन दिवसांमध्ये या समन्वयकांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना आंदोलनात सहभागी होऊन सकल मराठा समाजाच्या मागण्यांबाबत भूमिका मांडण्यासाठी निमंत्रण दिले आहे. या लोकप्रतिनिधींनी मूक आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. नर्सरी बागेतील समाधिस्थळी हे मूक आंदोलन केले जाणार आहे. त्याठिकाणी भगवे ध्वज लावणे, बैठक व्यवस्था, आदी स्वरूपातील तयारी सोमवारी करण्यात आली. मराठा आरक्षणासह अन्य विविध मागण्यांचे फलक हे जिल्ह्यात विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत. कोल्हापुरातील या आंदोलनानंतर नाशिक, अमरावती, संभाजीनगर, रायगड येथे मूक आंदोलने होणार आहेत.

चौकट

असे होणार मूक आंदोलन

या समाधिस्थळाच्या उजव्या बाजूला जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार यांची बैठक व्यवस्था असणार आहे. डाव्या बाजूला खासदार संभाजीराजे, कोल्हापूर आणि राज्यातील सकल मराठा समाजाचे समन्वयक, ‘सारथी’ संस्था आणि विविध पदांवरील नियुक्तींच्या प्रतीक्षेतील विद्यार्थी, मराठा समाजबांधव, भगिनी यांची बैठक व्यवस्था राहणार आहे. त्यांच्यासमोर या लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका मांडायची आहे.

चौकट

समाधिस्थळी आज बैठक

या आंदोलनाच्या तयारीचा आढावा आणि पूर्वनियोजनासाठी समाधिस्थळी आज, मंगळवारी सकाळी अकरा वाजता खासदार संभाजीराजे आणि मराठा समाजातील समन्वयकांची बैठक होणार असल्याची माहिती समन्वयक दिलीप देसाई यांनी दिली.

फोटो (१४०६२०२१-कोल-मराठा समाज) : मराठा आरक्षणासह अन्य विविध मागण्यांसाठी कोल्हापुरात बुधवारी सकल मराठा समाजाच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळी मूक आंदोलन करण्यात येणार आहे. या समाधिस्थळी भगवे ध्वज लावण्याचे काम सोमवारी सुरू होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)

===Photopath===

140621\14kol_5_14062021_5.jpg

===Caption===

फोटो (१४०६२०२१-कोल-मराठा समाज) : मराठा आरक्षणासह अन्य विविध मागण्यांसाठी कोल्हापुरात बुधवारी सकल मराठा समाजाच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी मूक आंदोलन करण्यात येणार आहे. या समाधीस्थळी भगवे ध्वज लावण्याचे काम सोमवारी सुरू होते. (छाया : आदित्य वेल्हाळ