शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

मुरगूडमध्ये आजपासून घुमणार शड्डू

By admin | Updated: January 21, 2015 23:58 IST

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा

मुरगूड : मुरगूड (ता. कागल) येथे राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने व लाल आखाडा व्यायाम मंडळाच्यावतीने राज्यस्तरीय मॅटवरील कुस्ती स्पर्धेला उद्या, गुरुवारपासून प्रारंभ होणार आहे. या आखाड्यामध्ये राज्यातील ५०० हून अधिक नामवंत मल्ल सहभागी होणार आहेत.मुरगूडचे माजी नगराध्यक्ष व बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एस.टी. स्टँडच्या शेजारील पटांगणात या स्पर्धेचे आयोजन केले आहे. खुल्या गटासाठी बुलेट, प्लॅटिना मोटारसायकलसह रोख रक्कम व लाल आखाडा चषक, तसेच विविध १५ वजनी गटांसाठी मिळून पाच लाखांहून अधिक रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत. सहभागी मल्लांची राहण्याची व जेवणाची सोय मोफत करण्यात आली आहे.उद्या सायंकाळी चार वाजता या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते होणार असून, मॅट पूजन आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ए. वाय. पाटील, सुधाकर साळोखे, मोहन गुजर, दिनकरराव कांबळे, नेताजी पाटील, वसंतराव शिंदे, आदी उपस्थित राहणार आहेत.शुक्रवारी (दि. २३) राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये विजेत्या मल्लांचा सत्कार होणार आहे.शनिवारी (दि. २४) सर्व गटांतील अंतिम लढती होणार आहेत. त्याचबरोबर या दिवशी लाल आखाडा चषकासह सर्व गटांतील बक्षीस वितरण होणार आहे. यावेळी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, शाहू कारखान्याचे संस्थाध्यक्ष विक्रमसिंह घाटगे, हसन मुश्रीफ, महादेवराव महाडिक, धनंजय महाडिक, आदी उपस्थित राहणार आहेत.भव्य स्क्रीन व थेट प्रक्षेपणाची सोयकुस्ती स्पर्धेला होणारी गर्दी लक्षात घेता संयोजकांनी यावेळी एस.टी. स्टँडच्या शेजारी भली मोठी स्क्रीन उभी केली आहे. कागल, राधानगरी, भुदरगड, आदी तालुक्यांत स्पर्धेचे थेट प्रक्षेपण केले जाणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.