शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सवात भाविक तल्लीन; गुजरी, महाद्वाररोडवर रांगोळी, फुलांचा वर्षाव- video

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 11:04 AM

सायंकाळी पाऊस पडल्यानंतरही हा सोहळा अनुभवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती

कोल्हापूर : अंबा माता की जयचा अखंड गजर, पोलिस बँडची धून, भव्य अशा रंगीबेरंगी रांगोळीचा गालिचा, फुलांचा वर्षाव आणि भाविकांच्या अलोट गर्दीत बुधवारी रात्री करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव सोहळा पार पडला. सायंकाळी पाऊस पडल्यानंतरही हा सोहळा अनुभवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत मंदिर उघडे होते.जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते रथोत्सवाचे पूजन झाले. त्यानंतर मंदिराच्या महाद्वार रोडकडील पश्चिम दरवाजातून अंबाबाईच्या रथोत्सवाला प्रारंभ झाला. रथाचे पूजन व तोफेच्या सलामीनंतर हा सोहळा सुरू झाला. श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे महाद्वार चौक ते जोतिबा रोड चौक येथे विद्युत रोषणाई व भव्य आतषबाजी करण्यात आली. रथोत्सव मार्गावर भाविकांनी भव्य अशा रंगीबेरंगी रांगोळ्यांचा सुरेख गालिचा घातला होता. रथापुढे मानकरी व मागे देवीची स्तुती करणारे मंत्रोच्चार व भक्तिगीतांनी वातावरण भक्तिमय बनले होते. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या भाविकांनी अंबा माता की जयचा गजर करत फुलांचा वर्षाव केला. अतिशय देखण्या लाकडी रथात अंबाबाईची उत्सवमूर्ती विराजमान झाली. आबालवृद्ध, महिला, युवक, युवती तिचे दर्शन घेतले. महाद्वार रोड, गुजरी, भवानी मंडप, गुरू महाराज वाडा, बालगोपाल तालीम मंडळ, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर मार्गे पुन्हा महाद्वारात येऊन रथोत्सवाची सांगता झाली. रथोत्सव आणि रांगोळ्याचा फोटो टिपण्यासाठी अनेकांचे मोबाइल सरसावले होते.

पावसाने रांगोळी वाहून गेली तरीहीगुजरी, महाद्वार रोडवर सायंकाळी चार वाजता रांगोळ्या काढण्यास सुरुवात केली. अनेक भाविकांच्या निम्या रांगाळ्या काढून पूर्ण झाल्या होत्या. दरम्यान, पाऊस पडला. त्यामुळे पावसाच्या पाण्याने रांगाळी वाहून गेली. पण भक्तांचा उत्साह कायम असल्याने पुन्हा नव्याने रांगाळ्या रेखाटल्या. न्यू गुजरी मित्रमंडळाने ८५० किलो रांगाळीचे वाटप केले. महाप्रसाद देण्यात आला.रांगोळीतून मतदानासंबंधी जनजागृतीलोकसभेसाठी ७ मे रोजी मतदान आहे. लोकशाही अधिक सदृढ होण्यासाठी मतदान करा, मतदानाचा हक्क बजवा, मतदार राजा जागा हो, लोकशाही धागा हो, आपला हक्क, आपला अधिकार, बनुया सुजाणन अन् जागरूक मतदार, माझे मत विकासाला असा रांगाेळीत रेखाटलेला आशय लक्षवेधी ठरला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर