शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
4
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
5
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
6
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
7
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
8
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
9
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
10
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
11
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
12
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
14
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
15
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
16
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
17
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
18
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
19
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
20
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांचा ऊस खरेदी कर माफच : सहकारमंत्री

By admin | Updated: January 10, 2015 00:25 IST

कारखान्यांना नोटिसाही लागू केल्याने साखर कारखानदारीतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे

कोल्हापूर : यंदाच्या हंगामातील (२०१४-१५) ऊस खरेदी कर माफ करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी विधानसभेत केली आहे. विधिमंडळाच्या सभागृहात जाहीर झालेली घोषणा ही कायदाच असते; त्यामुळे यंदाच्या हंगामातील ऊस खरेदी कर माफच असल्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
शासनाने घोषणा केली तरी त्यासंबंधीचा आदेशच न काढल्याने विक्रीकर विभागाने त्याची वसुली सुरू केली आहे. कारखान्यांना नोटिसाही लागू केल्याने साखर कारखानदारीतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. ही बाब सहकारमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. यंदाच्या हंगामात बाजारात साखरेचे दर घसरले आहेत; त्यामुळे ऊसदराचा तिढा तयार झाला आहे. बाजारात क्विंटलचा दर २४५० ते २५०० रुपये आहे व पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांची सरासरी ‘एफआरपी’ही तेवढीच आहे. त्यामुळे एफआरपी देतानाही कारखानदारांना घाम फुटला आहे. त्याची दखल घेऊन राज्य शासनाने ऊस खरेदी कर माफ करण्याचा निर्णय हिवाळी अधिवेशनात घेतला; परंतु त्या निर्णयानुसार त्यासंबंधीचा रीतसर प्रस्ताव तयार करून ो मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्याची गरज असते. तथापि ही प्रक्रिया न झाल्याने विक्रीकर विभागाने कारखानदारांना नोटिसा काढल्या. त्याबद्दल सहकारमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सहकारमंत्री पाटील म्हणाले, ‘मंत्र्याने विधिमंडळ सभागृहात दिलेला शब्द हा कायदाच असतो. त्यामुळे त्याचा आदेश काढण्यास पुढे-मागे झाले म्हणून लगेच नोटिसा काढणे हे चुकीचे आहे. मी आजच त्यासंदर्भात साखर आयुक्तांशी बोललो आहे. सरकार लवकरच त्यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडून ऊस खरेदी कर माफ करील. त्यामुळे तो वसूल करण्याची घाई विक्रीकर विभागाने करू नये.’
अर्थमंत्र्यांचेही तेच म्हणणे...
ऊस खरेदी कर माफ करून त्याचा सरकारने आदेश का काढला नाही, अशी विचारणा खासदार राजू शेट्टी यांच्याकडे केली. ते म्हणाले, ‘ऊस खरेदी कर माफ करण्यात यावा, अशी मागणी मी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली होती. त्यांचे मला कालच पत्र आले असून त्यांनी हा निर्णय सरकारने अधिवेशनातच घेतला असल्याचे कळविले आहे. त्यामुळे विक्रीकर विभागाने हा कर वसूल करण्याची गरज नाही.’