शॉक लागलेल्या वायरमनचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 11:13 IST2020-07-07T11:11:15+5:302020-07-07T11:13:56+5:30
वाळोली (ता. पन्हाळा) येथे आठवड्यापूर्वी विजेचा शॉक बसून गंभीर जखमी झालेल्या महावितरणच्या वायरमनचा सोमवारी कोल्हापुरात खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. किरण भाऊ चव्हाण (वय ३५, रा. चव्हाणवाडी, ता. पन्हाळा) असे त्यांचे नाव आहे.

शॉक लागलेल्या वायरमनचा मृत्यू
ठळक मुद्देशॉक लागलेल्या वायरमनचा मृत्यूवायरमन महावितरणमध्ये कंत्राटी कर्मचारी
कोल्हापूर : वाळोली (ता. पन्हाळा) येथे आठवड्यापूर्वी विजेचा शॉक बसून गंभीर जखमी झालेल्या महावितरणच्या वायरमनचा सोमवारी कोल्हापुरात खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. किरण भाऊ चव्हाण (वय ३५, रा. चव्हाणवाडी, ता. पन्हाळा) असे त्यांचे नाव आहे.
महावितरणमध्ये किरण चव्हाण हे कंत्राटी कर्मचारी होते. गेल्या आठवड्यात वाळोली येथे विजेच्या मुख्य वाहिनीवरील ट्रान्सफार्म दुरुस्तीचे काम सुरू असताना त्यांना विजेचा शॉक बसून ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारांसाठी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. सोमवारी त्यांचा मृत्यू झाला.