शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठाचे संशोधन मंत्रालयाच्या संकेतस्थळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2016 00:51 IST

बहुमान : सांडपाणी प्रक्रियेसाठी वनस्पतीचा वापर

कोल्हापूर : रंगमिश्रित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता काही वनस्पतींचा वापर केला जाऊ शकतो. हे शिवाजी विद्यापीठाचे संशोधन थेट केंद्रीय जैवतंत्रज्ञान मंत्रालयाच्या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर झळकले आहे. विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र विभागाच्या संशोधनास हा बहुमान मिळाला आहे. जैवतंत्रज्ञान मंत्रालयाने आपल्या अधिकृत टिष्ट्वटर हँडलवरून ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून ही माहिती प्रकाशित केली आहे. त्याला या विभागाचे केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, राज्यमंत्री वाय. एस. चौधरी यांनाही टॅग केले आहे.विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र विभागातील प्रा. एस. पी. गोविंदवार यांना कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया व शुद्धिकरणविषयक संशोधनासाठी केंद्र सरकारतर्फे विशेष प्रकल्प मंजूर झाला होता. रंगमिश्रित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता काही वनस्पतींचा वापर केला जाऊ शकतो, असे प्राथमिक संशोधनातून निष्पन्न झाले. या वनस्पतींचा वापर करून प्रयोगशाळेतच ‘पायलट स्केल रिक्टर’ बनविण्यात आले. या प्रकल्पाची यशोगाथा केंद्रीय जैवतंत्रज्ञान मंत्रालयाच्या (६६६.ुि३्रल्ल्िरं.ल्ल्रू.्रल्ल) या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर प्रकाशित केली आहे. या संशोधनासाठी डॉ. ज्योती जाधव, विश्वास बापट, अनुराधा कागलकर, राहुल खंडारे, अखिल काब्रा, अनुप्रिता वाठारकर, अस्मिता पाटील, नीरज राणे, विशाल चंदनशिवे, सुहास कदम, स्वप्निल पाटील यांचे योगदान लाभले. (प्रतिनिधी)नवा मानदंड प्रस्थापित : कुलगुरूया संशोधनाच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाने ग्रीन रिमेडिएशनच्या क्षेत्रातील संशोधनात नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. विभागप्रमुख प्रा. डॉ. ए. यू. अरविंदेकर यांच्या नेतृत्वाखाली जीवरसायनशास्त्र विभागाच्या संशोधनाला मंत्रालयाच्या संकेतस्थळावर मिळालेले स्थान हा विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केली.विद्यापीठाच्या संशोधकांना प्रदूषित सांडपाण्याचे शुद्धिकरण करण्यासाठी पर्यावरणपूरक व कमी खर्चिक तंत्रज्ञान विकसित करण्यात यश आले. हे तंत्रज्ञान नागरी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठीसुद्धा उपयुक्त ठरू शकते. त्याची सामाजिक उपयुक्तता लक्षात घेऊन जैवतंत्रज्ञान मंत्रालयाने ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून या संशोधनाची दखल घेतली आहे. मंत्रालयाने आपल्या अधिकृत टिष्ट्वटर हँडलवरून तसे टिष्ट्वटही केले आहे.- प्रा. एस. पी. गोविंदवार, जीवनरसायनशास्त्र विभाग