शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शिवाजी विद्यापीठाच्या अंदाजपत्रात संशोधनासाठी तब्बल २२७ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 19:46 IST

विद्यार्थिनींची वसतिगृहे होणार चकाचक

कोल्हापूर : जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिवाजी विद्यापीठानेसंशोधनात्मक सुविधांवर भर देतानाच २०२६-२७ साठी ५८७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक बुधवारी झालेल्या विद्यापीठाच्या अधिसभेत चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. तब्बल ८ कोटी ९१ लाख रुपयांच्या तुटीचे हे अंदाजपत्रक असून, ही तूट विद्यापीठ निधीतील शिलकेतून भरून काढण्यात येणार आहे.कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहू सभागृहात अधिसभा झाली. यावेळी प्र. कुलगुरु डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे उपस्थित होते. डॉ. रघुनाथ ढमकले यांनी २०२६-२७चे अंदाजपत्रक मांडले. यावर सदस्यांनी चर्चेनंतर मंजुरी दिली. या अंदाजपत्रकात संशोधनाला चालना देण्यात आली असून, तब्बल २७ कोटी रुपयांची तरतूद संशोधनासाठी केली आहे.

विभाग - जमा अपेक्षित  - खर्च अपेक्षित

  • प्रशासकीय - ४७ कोटी ५८ लाख  - ६२ कोटी ९७ लाख
  • शास्त्र अधिविभाग  - ५ कोटी ४० लाख - ८ कोटी १४ लाख
  • इतर अधिविभाग - ३ कोटी ५९ लाख - ७ कोटी ७१ लाख
  • इतर उपक्रम - ३५ कोटी ४८ लाख - ५५ कोटी ६६ लाख
  • वेतन अनुदान  -  १५४ कोटी ५१ लाख - १६३ कोटी ५१ लाख
  • विविध संस्था - ५ कोटी ०६ लाख  - २ कोटी ३७ लाख
  • संशोधन-विकास निधी - ३१ कोटी ६४ लाख - ३१ कोटी ६४ लाख
  • घसारा निधी - १३ कोटी ७७ लाख - १३ कोटी ७७ लाख
  • निलंबन लेखे  - २८१ कोटी ८४ लाख - २४२ कोटी ०१ लाख

संशोधनाला मिळणार चालनादर्जेदार संशोधन होण्यासाठी पुस्तके, जर्नल खरेदी व ग्रंथालयासाठी २ कोटी ६५ लाख, संगणक प्रणाली विकसित करण्यासाठी ४ कोटी १४ लाख, संगणक, फर्निचर, इलेक्ट्रिकलच्या पायाभूत सुविधांसाठी १५ कोटी ७३ लाख रुपयांची तरतूद केली आहे.

विद्यार्थिनींची वसतिगृहे होणार चकाचकविद्यापीठातील विद्यार्थिनींच्या वसतिगृहासाठी या अंदाजपत्रकात भरीव तरतूद केली आहे. नवीन वसतिगृहासाठी २ कोटी ५० लाख, वसतिगृह दुरुस्ती, मेसची दुरुस्ती व दैनंदिन खर्चासाठी २ कोटी १६ लाख रुपयांची तरतूद केली आहे. रिसर्च स्कॉलर होस्टेलसाठी १२ लाखांची तरतूद केली आहे.मैदानांच्या देखभालीसाठी ३४ लाखविद्यापीठातील मैदानांच्या देखभाल - दुरुस्तीसाठी घसारा निधीतून ३४ लाख रुपयांची तरतूद केली असून, खेळाचे साहित्य खरेदीसाठी ३० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेता यावा, यासाठी १५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

११ विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारणविद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष स्थापन केला असून, याचा अहवाल या बैठकीत सादर करण्यात आला. यात ११ विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आल्याचे नमूद केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Shivaji University Budget: ₹227 Crore for Research Initiatives

Web Summary : Shivaji University's ₹587 crore budget prioritizes research with a ₹27 crore allocation. The budget addresses infrastructure, library resources, and student facilities, including hostel improvements. Sports get a boost with funds for maintenance and international participation. A student grievance cell resolved 11 complaints.