शिवाजी विद्यापीठ महिला संघ तलवारबाजी स्पर्धेसाठी पंजाबला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 07:09 PM2018-03-21T19:09:00+5:302018-03-21T19:09:00+5:30

पतियाळा (पंजाब) येथे दि. २२ ते २४ मार्चदरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय विद्यापीठ महिला फेन्सिंग (तलवारबाजी) स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा महिला संघ बुधवारी रवाना झाला.

Shivaji University Women's team leaves for Punjab in fencing competition | शिवाजी विद्यापीठ महिला संघ तलवारबाजी स्पर्धेसाठी पंजाबला रवाना

पतियाळा येथे होणाऱ्या अखिल भारतीय विद्यापीठीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झालेल्या संघासोबत डॉ. पी. टी. गायकवाड व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Next
ठळक मुद्दे पतियाळा (पंजाब) येथे दि. २२ ते २४ मार्चदरम्यान महिला फेन्सिंग (तलवारबाजी) शिवाजी विद्यापीठाचा महिला संघ बुधवारी रवाना

कोल्हापूर : पतियाळा (पंजाब) येथे दि. २२ ते २४ मार्चदरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय विद्यापीठ महिला फेन्सिंग (तलवारबाजी) स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा महिला संघ बुधवारी रवाना झाला.

या संघात श्रीया रवी जाधव (राजमती पाटील कन्या महाविद्यालय, सांगली), यशश्री भालचंद्र पवार (पतंगराव कदम महाविद्यालय, सांगलीवाडी), अमरजा नितीन जोशी (कस्तुरभाई वालचंद कॉलेज, सांगली), ज्योती अरुण सुतार (न्यू कॉलेज, कोल्हापूर), स्नेहलता संजय कर्जने (किसन वीर महाविद्यालय, वाई, सातारा), रेश्मा कृष्णात तेजम, अंकिता शिवाजी पाटील (दोघेही शिवराज कॉलेज, गडहिंग्लज) यांचा समावेश आहे.

या खेळाडूंना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. पी. टी. गायकवाड, प्रशिक्षक राहुल मगदूम, संघव्यवस्थापक डॉ. धनंजय पाटील, ग्रॅबीयल रॉड्रीक्स, शशी दाभाडे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

 

 

Web Title: Shivaji University Women's team leaves for Punjab in fencing competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.