शिवाजी विद्यापीठाने माणगाव परिषदेचे शताब्दी वर्ष साजरे करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 01:01 PM2019-03-21T13:01:44+5:302019-03-21T13:03:31+5:30

माणगांव परिषदेचे शताब्दी वर्ष शिवाजी विद्यापीठाने साजरे करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने केली. ‘राष्ट्रवादी’चे (सामाजिक न्याय विभाग) राज्य उपाध्यक्ष अनिल कांबळे-माणगांवकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना निवेदन दिले.

Shivaji University should celebrate the centenary year of the Mangaon Parishad | शिवाजी विद्यापीठाने माणगाव परिषदेचे शताब्दी वर्ष साजरे करावे

 शिवाजी विद्यापीठाने विविध उपक्रमांद्वारे माणगाव परिषदेचे शताब्दी वर्ष साजरे करावे, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाच्या वतीने अनिल कांबळे-माणगावकर यांनी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना दिले. यावेळी डावीकडून हिरालाल कुरणे, शामराव कांबळे, संभाजीराव पवार, बाळासो कांबळे, नामदेव जोंधळे, डी. टी. शिर्के, विकास पाटील उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठाने माणगाव परिषदेचे शताब्दी वर्ष साजरे करावे‘राष्ट्रवादी’च्या शिष्टमंडळाची मागणी; कुलगुरुंना निवेदन

कोल्हापूर : माणगांव परिषदेचे शताब्दी वर्ष शिवाजी विद्यापीठाने साजरे करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने केली. ‘राष्ट्रवादी’चे (सामाजिक न्याय विभाग) राज्य उपाध्यक्ष अनिल कांबळे-माणगांवकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना निवेदन दिले.

या माणगांव परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या पूर्वार्धाला प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त शाहू व भीम अनुयायांमध्ये उत्साह, चैतन्याचे वातावरण आहे. अनेक आंबेडकरी पक्ष, संघटना आपापल्या परीने हे शताब्दी वर्ष साजरे करीत आहेत. अशावेळी शिवाजी विद्यापीठाने शाहू संशोधन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, ललितकला विभाग यांच्या वतीने चर्चासत्रे, परिसंवाद, माहितीपट, ग्रंथ व ऐतिहासिक दस्तऐवज, छायाचित्रातून जीवनपटाचे प्रदर्शन, पथनाट्य, ललितकला, ग्रंथनिर्मिती याद्वारे हे शताब्दी वर्ष साजरे करावे; त्यासाठी समिती गठीत करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. त्यावर विद्यापीठात शताब्दी साजरी करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के उपस्थित होते.

या शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संभाजीराव पवार, उपाध्यक्ष नामदेव जोंधळे, तालुका युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष विकास पाटील, कार्यकारिणी सदस्य हिरालाल कुरणे, बाळासाहेब कांबळे, शामराव कांबळे यांचा समावेश होता.

 

 

Web Title: Shivaji University should celebrate the centenary year of the Mangaon Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.