शिवाजी विद्यापीठ ‘युजीसी’च्या ‘कॅटेगरी-वन’मध्ये दाखल, ऑनलाईन अभ्यासक्रम राबविण्यास पात्र

By संतोष.मिठारी | Published: September 27, 2022 05:58 PM2022-09-27T17:58:05+5:302022-09-27T17:58:42+5:30

युजीसीने विद्यापीठांना श्रेणीबद्ध स्वायत्तता देण्याचा निर्णय २०१८ मध्ये घेतला.

Shivaji University has been awarded Category One status by UGC University Grants Commission | शिवाजी विद्यापीठ ‘युजीसी’च्या ‘कॅटेगरी-वन’मध्ये दाखल, ऑनलाईन अभ्यासक्रम राबविण्यास पात्र

शिवाजी विद्यापीठ ‘युजीसी’च्या ‘कॅटेगरी-वन’मध्ये दाखल, ऑनलाईन अभ्यासक्रम राबविण्यास पात्र

googlenewsNext

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाला युजीसीने (विद्यापीठ अनुदान आयोग) ‘कॅटेगरी-वन’ दर्जा बहाल करण्यात केला आहे. त्यामुळे ऑनलाईन अभ्यासक्रम राबविण्यास विद्यापीठ पात्र ठरले आहे.

युजीसीने विद्यापीठांना श्रेणीबद्ध स्वायत्तता देण्याचा निर्णय २०१८ मध्ये घेतला. त्यानुसार ‘नॅक’ (बंगळुरू) यांचे ३.५१ सीजीपीए गुणांकन आणि त्यावरील गुणांकनप्राप्त विद्यापीठांसाठी ‘कॅटेगरी-१’, ३.२६ ते ३.५० या दरम्यान गुणांकनप्राप्त विद्यापीठे ‘कॅटेगरी-२’ आणि त्याव्यतिरिक्त सर्व विद्यापीठे ‘कॅटेगरी-३’ अशी ही श्रेणीरचना करण्यात आली आहे.

विद्यापीठाला नॅकच्या ३.५२ सीजीपीए गुणांकनासह ‘ए-प्लस प्लस’ मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे युजीसीकडून विद्यापीठाला ‘कॅटेगरी-वन’ दर्जा प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे युजीसीच्या अनेकविधी सोयीसुविधा प्राप्त होण्यास विद्यापीठ पात्र ठरले आहे. दूरशिक्षण केंद्राला युजीसीकडून सलग पाच वर्षांसाठी मान्यता मिळाली आहे. यापूर्वी दरवर्षी ही प्रक्रिया करावी लागत असे. त्याचप्रमाणे विद्यापीठास स्वतःचे संचलित महाविद्यालय चालवावयाचे असल्यास त्यासही मान्यता मिळू शकते, असे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी मंगळवारी सांगितले.


दर्जा वाढल्याने शिवाजी विद्यापीठ आता ऑनलाईन अभ्यासक्रम राबविण्यासही पात्र ठरले आहे. त्यानुसार विद्यापीठ आता पुढे जात असून आवश्यक कन्टेन्ट (आशय) विकसित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. नजीकच्या काळात याचे आणखीही लाभ विद्यापीठाला पर्यायाने विद्यार्थ्यांना होतील. -कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

Web Title: Shivaji University has been awarded Category One status by UGC University Grants Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.