शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवाजी,’ ‘पाटाकडील’ची आगेकूच

By admin | Updated: April 3, 2015 23:58 IST

नेताजी चषक फुटबॉल स्पर्धा :पॅट्रियट, दिलबहार (ब) पराभूत

कोल्हापूर : शिवाजी तरुण मंडळाने दिलबहार (ब)चा, तर दुसऱ्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळाने पॅट्रियटचा ५-० असा दणदणीत पराभव करीत नेताजी चषक फुटबॉल स्पर्धेची पुढील फेरी गाठली. ‘पाटाकडील (अ)’च्या हृषिकेश मेथे-पाटील व ‘शिवाजी’च्या आकाश भोसलेची हॅट्ट्रिक लक्षणीय ठरली.शाहू स्टेडियम येथे शुक्रवारी शिवाजी तरुण मंडळ व दिलबहार (ब) यांच्यात सामना झाला. सामन्याच्या सुरुवातीपासून ‘शिवाजी’कडून वैभव राऊत, अनिरुद्ध शिंदे, आकाश भोसले, स्वप्निल पाटील, चिंतामणी राजवाडे यांनी चढाया करीत दिलबहार (ब)वर वर्चस्व निर्माण केले. ३२ व्या मिनिटास ‘शिवाजी’च्या आकाश भोसलेने गोल करीत १-० अशी आघाडी मिळविली. दिलबहार (ब)कडून शशांक माने, लखन मुळीक, स्वप्निल साळोखे, आदित्य लाड, शुभम सरनाईक यांनी बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. उत्तरार्धात सामन्यावर शिवाजी तरुण मंडळाचेच वर्चस्व होते. शिवाजीकडून योगेश सरनाईकच्या पासवर सूर्यजित घोरपडे याने ७० व्या मिनिटास दुसरा गोल नोंदवीत २-० अशी आघाडी घेतली. ७७, ८० आणि ८२ व्या मिनिटाला ‘शिवाजी’च्या आकाश भोसले याने हॅट्ट्रिक साधत विजयावर शिक्कामोर्तब केले. दुसरा सामना पाटाकडील (अ) व पॅट्रियट स्पोर्टस यांच्यात झाला. पाटाकडील (अ)ने तिसऱ्या मिनिटापासून अक्षय मेथे-पाटीलच्या पासवर रूपेश सुर्वेने पहिला गोल नोंदवीत सामन्यावर वर्चस्व निर्माण केले. पाटाकडील (अ)च्या आक्रमणापुढे पॅट्रियटचा बचाव तोकडा पडला. १७ व्या मिनिटास पाटाकडील (अ)कडून सैफ हकीमच्या पासवर उत्सव मरळकरने गोल नोंदवीत संघास २-० अशी आघाडी मिळवून दिली. पाटाकडील (अ)कडून हृषिकेश मेथे-पाटील याने ३५, ४० व ५६ मिनिटास सलग तीन गोल नोंदवीत ५-० अशी आघाडी घेतली.