शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

महापौरपदाचे ‘शिवधनुष्य’ काँग्रेसच्या हातात : शिवसेनेच्या निर्णयाने भाजप-‘ताराराणी’च्या मनसुब्यावर फिरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:24 AM

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या राजकारणातील कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडी तसेच भाजप-ताराराणी आघाडी यांपैकी कोणालाही थेट पाठिंबा न देता तटस्थ राहण्याचा शिवसेनेने घेतलेला निर्णय कॉँग्रेसच्या

ठळक मुद्दे कोल्हापूर लढतीतील हवा संपली -पाणीलढतीतील हवा संपली

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या राजकारणातील कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडी तसेच भाजप-ताराराणी आघाडी यांपैकी कोणालाही थेट पाठिंबा न देता तटस्थ राहण्याचा शिवसेनेने घेतलेला निर्णय कॉँग्रेसच्या पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे ही अप्रत्यक्षपणे कॉँग्रेसला मदतच असल्याचा राजकीय अर्थ काढला जात असून, भाजपला सेनेने स्पष्टपणे नाकारले आहे

आज, शुक्रवारी सकाळी महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक होत असल्याने गुरुवारी सकाळपासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला. रात्री उशिरा एकमेकांशी संपर्क साधण्याचे, नगरसेवकांना आमिष दाखवून फोडण्याचे प्रयत्न सुरू होते. यामध्ये अल्पमतात असलेल्या भाजप-ताराराणी आघाडीचे नेते आघाडीवर असल्याचे दिसून आले; तर काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील सातत्याने शिवसेनेच्या संपर्कात होते. शिवसेनेने यापुढे कोणाबरोबर फरफटत न जाता आपले केवळ ‘कोल्हापूर उत्तर’मधील हित पाहिल्याचे बोलले जात आहे.

गेल्या चार दिवसांपासून गोव्यातील पंचतारांकित हॉटेलवर असलेले काँग्रेस-राष्टÑवादीचे ४२ नगरसेवक गुरुवारी रात्री बेळगावमध्ये पोहोचले. तेथून ते शुक्रवारी सकाळी थेट महानगरपालिकेत जाणार आहेत; तर तिलारी येथील एका रिसॉर्टवर वास्तव्यास असलेले भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवक रात्री उशिरा निपाणी परिसरात येऊन पोहोचले. तेही शुक्रवारी सकाळी थेट महानगरपालिकेत जाणार आहेत. सर्वच नगरसेवकांवर त्यांच्या आघाडीच्या नेत्यांनी विशेष लक्ष ठेवले असून, त्यांचा कोणाशी संपर्क होणार नाही, याची खबरदारी घेतली आहे.

दरम्यान, आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या प्रशासनाने नियोजनपूर्वक तयारी केली आहे. निवडणुकीची प्रक्रिया आणि पोलीस बंदोबस्त या पार्श्वभूमीवर गुरुवारी महापालिकेत बैठक झाली. बैठकीस उपायुक्त मंगेश शिंदे, नगरसचिव दिवाकर कारंडे, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक तानाजी सावंत, वाहतूक शाखेचे निरीक्षक अशोक धुमाळ उपस्थित होते. महापालिकेच्या चौकात शुक्रवारी नगरसेवक, कर्मचारी, पत्रकारांव्यतिरिक्त कोणालाही आत सोडले जाणार नाही. सर्वांची वाहने बाहेर पार्क केली जाणार आहेत. महापालिकेसमोरील मुख्य रस्ता निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

काँग्रेस नेत्यांचे भावनिक आवाहनासह घेतली शपथसुरुवातीला असलेली नाराजी दूर करत कॉँग्रेस व राष्टÑवादीमधील नगरसेवकांना एकत्र ठेवण्याकरिता आमदार सतेज पाटील यांनी आपले कौशल्य पणाला लावले. यापूर्वी ते कधीही नगरसेवकांसोबत दौऱ्यावर गेले नाहीत. यावेळी मात्र त्यांनी दोन दिवस सहलीत सहभागी होऊन नगरसेवकांशी जवळीक साधली. गुरुवारी झालेल्या बैठकीत आमदार पाटील यांनी भावनिक आवाहन करत नगरसेवकांना एकसंध राहण्याचा सल्ला दिला. महापौर निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांसोबत राहण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.दोन नगरसेवक कमी असल्याचा ‘ताराराणी’चा दावागुरुवारी रात्री शिवसेना आपल्याबरोबर राहणार असल्याची चर्चा भाजप-ताराराणी आघाडीतून सुरू करण्यात आली. त्यामुळे शिवसेनेचे ४ नगरसेवक तसेच राष्टÑवादीचे अजिंक्य चव्हाण व अफजल पिरजादे मिळून आकडा ३९ वर (३३ +४+२ =३९) पोहोचल्याचा दावा त्यांच्या आघाडीतील नगरसेवक करत होते. महापौर निवडीसाठी आणखी दोन नगरसेवक कमी पडत असून त्याच्यासाठी फासे टाकण्यात आल्याचीही चर्चा सुरू होती.दोन्ही आघाडींचा शिवसेनेकडे मदतीचा धावागेल्या दोन वर्षांत काँग्रेस-राष्टÑवादीसोबत राहिलेल्या शिवसेनेने महापौर-उपमहापौरपदासाठी अनपेक्षितपणे उमेदवारी अर्ज भरले. यामुळे ‘ताराराणी’च्या उमेदवारास अप्रत्यक्ष फायदा होणार होता. त्यामुळे आमदार सतेज पाटील यांनी शिवसेनेच्या चारही नगरसेवकांनी आपल्यासोबतच राहावे यासाठी प्रयत्न केले; तर सेनेने स्वतंत्र न लढता आपल्या बाजूने उघड मतदान करावे यासाठी भाजप-ताराराणी आघाडीने आग्रह धरला होता. सेनेने रात्री साडेनऊ वाजता आपले पत्ते खोलले आणि सगळे चित्र स्पष्ट झाले.अशी होईल निवडणूक प्रक्रियासकाळी अकरा वाजता पीठासन अधिकारी कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात होईल.सभागृहात फक्त नगरसेवकांना सोडले जाईल. यावेळी त्यांच्या ओळखपत्रांची तपासणी केली जाईल.मतमोजणी अधिकारी म्हणून संजय सरनाईक, डॉ. विजय पाटील तर सहायक म्हणून सुधाकर चल्लावाड व राम काटकर काम पाहतील.निवडणूक प्रक्रिया सुरू होताच उमेदवारी मागे घेण्याकरिता १५ मिनिटांचा वेळ दिला जाईल. माघार न घेतल्यास मतदान होईल.मतदान हात वर करून उघड पद्धतीने होईल, त्याचे व्हीडिओ चित्रीकरण केले जाणार आहे. सभागृहात दोन कॅमेरे असतील.महानगरपालिका परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे तसेच रुग्णवाहिकाही राहील.सभागृहाभोवती संरक्षण देण्याची जबाबदारी अग्निशमन दलावर सोपविण्यात आली आहे. 

काँग्रेस-राष्टÑवादी आघाडी एकसंध आहे. सर्व नगरसेवकांशी व्यक्तिगत चर्चा करून त्यांच्या मनातील शंका-कुशंका, नाराजी दूर केली आहे. आम्ही सुरुवातीपासून फोडाफोडीचे तसेच घोडेबाजाराचे राजकारण केलेले नाही. संख्याबळ पाहता महापौर काँग्रेसचा होईल यात आमच्या मनात शंका नाही.- सतेज पाटील,आमदार, काँग्रेसआम्ही आशावादी आहोत. राजकारणात संधी पुन्हा-पुन्हा येत नसते. नेतेमंडळींनी योग्यप्रकारे फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे आकडेमोडीचे गणित जमेल, असा आमचा विश्वास आहे. काही अडचण सध्यातरी दिसत नाही.त्यामुळे महापौरताराराणी आघाडीचाच होईल.- सत्यजित कदम, गटनेता, ताराराणी आघाडी

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस