शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

Maharashtra Vidhan Sabha 2019 : शिवसेनेच्या उमेदवारांचे चंद्रकांत पाटील यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2019 2:00 PM

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आठ ठिकाणच्या शिवसेना उमेदवारांनी आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना साकडे घातले असून, प्रत्येक मतदारसंघातील भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याची विनंती केली आहे. यातील काहींनी फोनवरून पाटील यांच्याशी संपर्क साधला असून, माघारीपर्यंत प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

ठळक मुद्देशिवसेनेच्या उमेदवारांचे चंद्रकांत पाटील यांना साकडेभाजपच्या नेते, कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याची विनंती

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये आठ ठिकाणच्या शिवसेना उमेदवारांनी आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना साकडे घातले असून, प्रत्येक मतदारसंघातील भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याची विनंती केली आहे. यातील काहींनी फोनवरून पाटील यांच्याशी संपर्क साधला असून, माघारीपर्यंत प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.जिल्ह्यातील सहा विद्यमान शिवसेना आमदारांपैकी राजेश क्षीरसागर आणि पाटील यांच्यामध्ये सर्वाधिक राजकीय चकमक उडाली आहे. गेल्या चार वर्षांमध्ये भाजप आणि क्षीरसागर समर्थक यांच्यामध्ये जोरदार आरोप, प्रत्यारोप होऊन पत्रकबाजी झाली आहे. क्षीरसागर वगळता अन्य कोणत्याही आमदाराने पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्याशी फार पंगा घेण्याचा प्रयत्न केला नाही.उलट चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर यांनी पाटील यांच्या ‘गुडबुक’मध्ये जाऊन निधीही मिळवून आणला. या पार्श्वभूमीवर आता या सहाही विद्यमान आमदारांना आणि कागलचे संजय घाटगे, चंदगडचे संग्रामसिंह कुपेकर यांनाही पाटील यांच्यासह भाजप नेते कार्यकर्त्यांच्या पाठबळाची गरज भासणार आहे. चंदगड, शिरोळमध्ये भाजपचे नेते नाराज असून, कागलमधून समरजितसिंह घाटगे बंडाच्या पवित्र्यात आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच शिवसेना उमेदवार आता चंद्रकांत पाटील यांनी युतीचे शिल्पकार म्हणून जे काम केले, त्यानुसार आपल्या मतदारसंघातील भाजपचे नेते, कार्यकर्त्यांना आदेश द्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.आबिटकर यांनी घेतली पाटील यांची भेटप्रकाश आबिटकर यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आहे. पाटील हे सुरेश हाळवणकर यांचा अर्ज दाखल करण्यासाठी हेलिकॉप्टरने दुपारी चिप्री येथे आले होते. तेथेच आबिटकर यांनी पाटील यांची भेट घेऊन सहकार्याची विनंती केली.कुपेकरांचा अर्ज भरताना भाजप तालुकाध्यक्ष अनुपस्थितचंदगड विधानसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार संग्राम कुपेकर यांच्या अर्ज दाखल करताना किमान दाखवण्यासाठी का असेना भाजपचे गडहिंग्लज, आजरा, चंदगडचे तालुकाध्यक्ष उपस्थित असणे आवश्यक होते. मात्र हे तिघेही यावेळी उपस्थित नसल्याने युतीच्या कार्यकर्त्यांचे मनोमीलन झाले नसल्याचे स्पष्ट होत आहे. 

 

टॅग्स :kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरchandrakant patilचंद्रकांत पाटीलRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरkolhapurकोल्हापूर