कोल्हापूर : लिंगायत महामोर्चात शिरोमणी अकाली दलाचे सरदार जसकरण सिंग सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 12:20 PM2018-01-28T12:20:30+5:302018-01-28T12:25:04+5:30

अखिल भारतीय लिंगायत समाजाच्यावतीने विविध मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चाला शिरोमणी अकाली दलानेही पाठिंबा दिला आहे. या समाजाचे सरदार जसकरण सिंग यांच्यासह तेराजण कोल्हापूरात दाखल झाले आहेत. त्यांनी या महामोर्चात आपल्या सहकाऱ्यांसह महामोर्चाच्या ठिकाणी दसरा चौकात ठिय्या मांडला आहे.

Shiromani Akali Dal's Sardar Jashkaran Singh Participant in the Lingayat Awami | कोल्हापूर : लिंगायत महामोर्चात शिरोमणी अकाली दलाचे सरदार जसकरण सिंग सहभागी

: कोल्हापूरात रविवारी लिंंगायत महामोर्चासंदर्भात शिरोमणी अकाली दलाचे जसकरण सिंग यांना चित्रदुर्ग मठात कोरणेश्वर अप्पा महास्वामी यांनी माहिती दिली.

googlenewsNext
ठळक मुद्देलिंगायत महामोर्चात शिरोमणी अकाली दलाचे सरदार जसकरण सिंग सहभागीमुस्लिम बांधवही सहभागी

कोल्हापूर : अखिल भारतीय लिंगायत समाजाच्यावतीने विविध मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चाला शिरोमणी अकाली दलानेही पाठिंबा दिला आहे. या समाजाचे सरदार जसकरण सिंग यांच्यासह तेराजण कोल्हापूरात दाखल झाले आहेत. त्यांनी या महामोर्चात आपल्या सहकाऱ्यांसह महामोर्चाच्या ठिकाणी दसरा चौकात ठिय्या मांडला आहे.

शिरोमणी अकाली दलाचे सरदार जसकरण सिंग यांच्यासह सरदार महेंद्रपाल सिंग, सरदार अमृतसिंग, सरदार हरपाजन सिंग काश्मिरी, सरदार रणजितसिंग सिंगेडा, सरदार कुलदीप सिंग पागोवाळ, सरदार कर्मसिंग मोईया, सरदार परगट सिंग मखू, सरदार रमिंदर सिंग जुवेसे, सरदार नवदीप सिंग, सरदार प्रतपाल सिंग, सरदार लालन मोहन आदी शिरोमणी अकाली दलाचे सरदार उपस्थित होते.

दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात महामोर्चाचे कोरणेश्वर अप्पा महास्वामी यांनी या लिंंगायत मोर्चाबद्दल या शिरोमणी अकाली दलाच्या जत्थ्याला माहिती दिली. त्यानंतर सरदार जसकरण सिंग यांनी लिंगायत मोर्चाला पाठिंबा दिला.


 

कोल्हापूरात रविवारी चित्रदुर्ग मठात कोरणेवर अप्पा महास्वामी यांनी लिंगायत मोर्चासंदभांत मुस्लिम बांधवांना माहिती दिली.

मुस्लिम बांधवही सहभागी

या महामोर्चात मुस्लिम बांधवही सहभागी झाले. कोल्हापूरातील मुफ्ती मुहम्मद फारुक शेख, मौलाना अब्दुर्रउफ नाईकवाडे, हाफिज जावीद शेख, अबुबकर मुल्ला आदि मुस्लिम बांधव या मोर्चात सहभागी झाले आहेत.

 

 

Web Title: Shiromani Akali Dal's Sardar Jashkaran Singh Participant in the Lingayat Awami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.