शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळवर स्वाभिमानी, राष्ट्रवादीचाही दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 00:32 IST

कोल्हापूर : शिरोळ मतदारसंघावरून राष्ट्रवादी आणि ‘स्वाभिमानी’मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोघांनीही दावा कायम ठेवल्याने पेच निर्माण झाला आहे. ...

कोल्हापूर : शिरोळ मतदारसंघावरून राष्ट्रवादी आणि ‘स्वाभिमानी’मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोघांनीही दावा कायम ठेवल्याने पेच निर्माण झाला आहे. निवडून येण्याच्या क्षमतेवर राष्ट्रवादीने जोर लावला आहे, तर ‘स्वाभिमानी’ने घरचे मैदान म्हणून आग्रह धरला आहे.जागा सुटत नसल्यास स्वबळावर लढण्याचा इशारा देऊन दबाव निर्माण करण्याचा प्रयत्नही ‘स्वाभिमानी’कडून सुरू आहे. येथून सावकर मादनाईक अथवा स्वत: राजू शेट्टीच रिंगणात असणार आहेत. ही जागा संघटनेकडे गेल्यास अडचण होणार, हे गृहीत धरून राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना बंडखोरीस प्रवृत्त करण्याच्याही हालचाली सुरू आहेत.शिरोळ हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला; पण सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत उल्हास पाटील यांनी बंडखोरी केली. शिवसेनेची उमेदवारी घेत त्यांनी विजयही मिळविला. यावेळी राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. ‘स्वाभिमानी’चे उमेदवार सावकर मादनाईक हे तिसºया क्रमांकावर गेले. स्वाभिमानी आणि भाजपची युती होती. आता स्वाभिमानी-काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आहे. त्यांनी चार जागा मागितल्या असल्या तरी शिरोळवर प्राधान्याने हक्क सांगितला आहे. शिरोळ मिळाले नाही तर आघाडी तोडून स्वतंत्र लढण्याचाही निर्धार करण्यात आला आहे. आघाडी धर्म म्हणून ‘स्वाभिमानी’ला जागा दिली तरी यड्रावकरांना बंडखोरी करायला लावण्याच्या हालचाली वाढल्याने सावध झालेल्या ‘स्वाभिमानी’ने गुरुवारी कोल्हापुरात निवडक कार्यकर्त्यांची तातडीची बैठक घेऊन सन्मानाने जागा सुटल्या नाहीत तर सर्वच जागा स्वबळावर लढू, असे जाहीर केले आहे.यड्रावकरांनी कोणत्याही परिस्थितीत रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे; पण ‘स्वाभिमानी’ला ही जागा सुटेल, अशी चिन्हे दिसू लागताच ‘जनसुराज्य’चे विनय कोरे यांनी यड्रावकरांची भेट घेऊन आपल्याकडे येण्याचा आग्रह धरला आहे.शिवाय नुकतेच काँग्रेस सोडून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरत असल्याची घोषणा केलेल्या प्रकाश आवाडे यांनीही यड्रावकरांसाठी दारे खुली केली आहेत. इचलकरंजीबरोबरच हातकणंगले आणि शिरोळ लढविण्याची झालेली घोषणा हा या घडामोडींचाच परिपाक आहे.‘ए. वाय.’ यांना थांबविण्याच्या हालचालीराधानगरी-भुदरगड मतदारसंघात के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील यांच्या उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्याचा फैसला पुण्यात स्वत: शरद पवार उद्या, शनिवारी करणार आहेत. आगामी काळातील स्थानिक पातळीवरील निवडणुकांचे राजकारण डोळ्यासमोर ठेवूनच या दोघांमध्ये समझोता करण्याचे प्रयत्न होणार आहेत. ए. वाय. पाटील यांना थांबण्यासाठीच्या हालचालीही गतिमान झाल्या आहेत.दोन दिवसांत निर्णय : राजू शेट्टी हे महाराष्ट्राच्या दौºयावर आहेत. दोन दिवसांनी ते कोल्हापुरात येणार आहेत. तेव्हाच ते शिरोळमधीलच उमेदवारीचा गुंता सोडविणार आहेत. दरम्यान, आघाडीकडून फसवणूक होईल, या भीतीने कार्यकर्त्यांनी स्वबळाचा आग्रह धरला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी बुधवारी ‘स्वाभिमानी’च्या जिल्हा कार्यकर्त्यांची बैठक झाली. भगवान काटे, जालंदर पाटील, राजेंद्र गड्यान्नावर, वैभव कांबळे, अजित पोवार यांची प्रमुख उपस्थिती होती.