शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळ ग्रामपंचायत नगरपरिषदेच्या मार्गावर

By admin | Updated: April 13, 2015 00:02 IST

शासनाच्या राजपत्रात उद्घोषणा : आक्षेपासाठी ३० दिवसांची मुदत

शिरोळ : शिरोळला ग्रामपंचायत ऐवजी नगरपालिका करण्याची उद्घोषणा झाली असून, त्यादृष्टीने शासनस्तरावर प्रयत्न अंतिम टप्प्यात सुरू आहेत. जयसिंगपूर, कुरुंदवाडनंतर तालुक्यातील तिसरी नगरपालिका होण्याच्या मार्गावर असून शासनाने जाहीर केलेल्या अभिसूचनेला आक्षेप घेण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी दिला आहे. नगरपालिका झाल्यानंतर शिरोळच्या विकासाला मोठा निधी मिळणार आहे.मार्च २०१४ मध्ये तत्कालीन आघाडी शासनाने राज्यातील १३८ गावे नगरपरिषद व नगरपंचायती मंजूर केल्याचे आदेश जारी केले होते. शिरोळला नगरपरिषद की नगरपंचायत अशी संभ्रमावस्था निर्माण झाली होती. नगरपरिषदेबाबतचा प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आला होता. शासनाच्या लालफितीत अडकलेला नगरपरिषदेबाबतचा प्रस्ताव अखेर मंजूर झाला आहे. ६ एप्रिल २०१५ रोजी महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्रात याबाबतची उद्घोषणाही प्रसिद्ध झाली आहे. याशिवाय शिरोळ तहसील कार्यालय, ग्रामपंचायत आणि जिल्हाधिकारी कार्यालयात हद्दीबद्दल माहितीही उपलब्ध करण्यात आली आहे. यात क्षेत्र दर्शविणारा आराखडा जोडलेला आहे. यामुळे निश्चित शिरोळची नगरपरिषदेकडे वाटचाल सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)विकासाला चालनाशहराची वाढती लोकसंख्या, अपुरे पडणारे ग्रामपंचायतीचे उत्पन्न, सेवा-सुविधा पुरविताना ग्रामपंचायतीची होणारी दमछाक या पार्श्वभूमीवर तालुकापातळीवर सर्वच ग्रामपंचायत नगरपरिषद व नगरपंचायतीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय तत्कालीन राज्य शासनाने घेतला होता. ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी यापूर्वीच नगरपरिषदेबाबतचा प्रस्ताव शासनाकडे देऊन पाठपुरावा सुरू ठेवला होता.नगरपरिषद होण्याच्या दृष्टिकोनातून शासनस्तरावर प्रयत्न अंतिम टप्प्यात सुरू आहे. ग्रामपंचायतऐवजी नगरपालिका करण्याची उद्घोषणा झाली असली तरी यावर आक्षेप सादर करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी राखून ठेवण्यात आला आहे. त्यानंतरच नगरपरिषदेबाबतचा अंतिम निर्णय शासनाकडून जाहीर होणार आहे.राजकीय इच्छाशक्तीची गरजनगरपरिषद झाल्यानंतर गावच्या विकासाला चालना मिळणार आहे. रस्ते, आरोग्य, पाणी, स्वच्छता याशिवाय विविध सुविधा निर्माण करण्यासाठी नगरपरिषदेचा निधी उपयुक्त ठरणार आहे. विकासात्मक दृष्टिकोन ठेवून गाव पुढाऱ्यांनी नगरपरिषदेला अंतिम मुहूर्त देण्यासाठी पुढाकार घेतला तरच नगरपरिषद होण्यास कोणतीही अडचण होणार नाही.