शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

...तर शिंगणापूर उपसा केंद्र बंद पाडू : ग्रामस्थ

By admin | Updated: July 4, 2015 00:46 IST

हद्दवाढीला विरोध : वीस गावांतील ग्रामस्थ एकवटले

कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीच्या प्रश्नावरून ‘शहरी व ग्रामीण’ असा वाद आता अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. प्रस्तावित हद्दवाढीत समाविष्ट असलेल्या गावांचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा काही नगरसेवकांनी दिला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून, जर पाणीपुरवठा बंद केला तर शिंगणापूर हद्दीत असलेले महानगरपालिकेचे पाणी उपसा केंद्र बंद पाडले जाईल, असा इशारा २० गावांतील ग्रामस्थांनी शुक्रवारी दिला. करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, तसेच २० गावांतील सरपंच, उपसरपंच, आदींच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांची भेट घेऊन शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीस ठाम विरोध दर्शविला.तसे लेखी निवेदनही त्यांना देण्यात आले. शहराचा विकास करायला महानगरपालिकेला जमले नाही. आता आमची गावे घेऊन काय विकास करणार आहेत? असा सवाल काहींनी केला. हद्दवाढीला आमचा ठाम विरोध आहे. तो विचारात घेतला नाही, तर मात्र सरकारविरोधात न्यायालयात जावे लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.गेल्याच आठवड्यात शहरातील हद्दवाढ कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन जर हद्दवाढीला विरोध केला जाणार असेल तर संबंधित गावांचा पाणीपुरवठा बंद केला जाईल, असा इशारा दिला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून शुक्रवारी ग्रामस्थांकडून, शिंगणापूर येथील महानगरपालिकेचे पाणी उपसा केंद्र बंद पाडले जाईल, असा इशारा देण्यात आला. शिष्टमंडळात करवीर पंचायत समितीच्या सभापती पूनम जाधव, उपसभापती दत्तात्रय मुळीक, माजी सभापती दिलीप टिपुगडे, जिल्हा परिषदेचे सदस्य एकनाथ पाटील, बाबासो माळी, मनीषा वास्कर, पंचायत समिती सदस्य भूजगोंडा पाटील, सचिन पाटील, जयसिंग काशीद, उचगावच्या सरपंच सुरेखा चौगुले, शियेच्या सरपंच लक्ष्मी फडतरे, वडणगेचे उपसरपंच सचिन चौगुले, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)हद्दवाढविरोधी समितीचा उद्या मेळावाकोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढविरोधी कृती समितीतर्फे कळंबा येथील अमृतसिद्धी सभागृहामध्ये उद्या, रविवारी दुपारी एक वाजता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार संपतबापू पवार-पाटील, बाबा देसाई, भगवान काटे मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यास हद्दवाढीतील प्रस्तावित २० गावांमधील ग्रामस्थ, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य व पदाधिकारी यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी हद्दवाढीला विरोध करण्यासाठी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. ग्रामस्थांच्या सूचना व मते विचारात घेण्यात येणार आहेत. तरी या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन कृती समितीने पत्रकाद्वारे केले आहे.