यात्रेकरुंना दिलासा... आता ते येणार स्वगृही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 13:42 IST2020-04-30T13:40:32+5:302020-04-30T13:42:50+5:30

दि. ७ मार्च रोजी महाराष्ट्रातून सम्मेद शिखरजी या तीर्थक्षेत्र दर्शनासाठी निघालले यात्रेकरू कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने त्यांचा प्रवास अर्धवट सोडून स्वस्थळी परतत असताना (मध्यप्रदेशमधून खावासा सीमामार्गे) महाराष्ट्रात दि. २५ मार्च रोजी नागपूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र रामटेक येथे दाखल झाले.

 Shikharji pilgrims stranded in Ramtek will return home | यात्रेकरुंना दिलासा... आता ते येणार स्वगृही...

यात्रेकरुंना दिलासा... आता ते येणार स्वगृही...

ठळक मुद्देकारण रामटेकमध्ये अडकलेले शिखरजी यात्रेकरू घरी परतणार

कोल्हापूर : सम्मेद शिखरजी या तीर्थक्षेत्र दर्शनासाठी गेलेल्या आणि लॉकडाऊनमुळे रामटेक येथे अडकलेल्या कोल्हापूर, सांगली, सोलापूर या तीन जिल्ह्यांतील ५१ यात्रेकरू घरी परतणार आहेत. या यात्रेकरूंना स्वगृही येण्यास बुधवारी परवानगी मिळाली आहे. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी त्यासाठी प्रयत्न केले.
दि. ७ मार्च रोजी महाराष्ट्रातून सम्मेद शिखरजी या तीर्थक्षेत्र दर्शनासाठी निघालले यात्रेकरू कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने त्यांचा प्रवास अर्धवट सोडून स्वस्थळी परतत असताना (मध्यप्रदेशमधून खावासा सीमामार्गे) महाराष्ट्रात दि. २५ मार्च रोजी नागपूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र रामटेक येथे दाखल झाले.

जिल्हाबंदी असल्यामुळे त्यांना घरी जाण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. या यात्रेकरूंनी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर राज्यमंत्री यड्रावकर यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा केली. पण जिल्हाबंदी असल्याने त्यांना परवानगी मिळाली नाही. त्यावर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करुन यात्रेकरूंना स्वगृही परत आणण्यासाठी प्रयत्न केले.
 
Web Title:  Shikharji pilgrims stranded in Ramtek will return home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.