शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

शिये ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा

By admin | Updated: August 25, 2014 22:53 IST

ग्रामस्थांचे आंदोलन : अनियमित पाणीपुरवठ्याचा निषेध

कोल्हापूर : गेल्या काही महिन्यांपासून पिण्याचा पाणीपुरवठा वारंवार खंडित झाल्यामुळे हनुमाननगर येथील शेकडो त्रस्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून ग्रामपंचायतीचा निषेध व्यक्त करीत घोषणांनी परिसर दणाणून सोडला. दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशाराही मोर्चातील कार्यकर्त्यांनी दिला.या महिला मोर्चासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी सरपंच व सदस्यांना ठणकावताना तुम्हाला पाणीपुरवठा सुरळीत करणे जमत नसेल तर आम्हाला श्रीरामनगर व हनुमाननगरसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत द्या, अशी मागणी केली. त्यानंतर सरपंच लक्ष्मी फडतारे, उपसरपंच प्रवीण चौगले यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मोर्चा स्थगित केला. यावेळी जि. प.चे सदस्य बाजीराव पाटील, पांडुरंग पाटील, ग्रा.पं. सदस्य रणजित कदम, शिवाजी गाडवे, मनोहर सुतार उपस्थित होते. मोर्चामध्ये सागर शिंदे, उदय जाधव, सुभाष जाधव, राहुल कर्णे, ग्रा.पं. सदस्या नयना शिंदे, शकुंतला माने, मंगल जाधव, सुनीता गाडवे, अरुणा जाधव, अनिता निकम, सरस्वती गाडवे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)सहा महिन्यांपासून पाणीपुरवठा अनियमितपाच-सहा महिन्यांपासून हनुमाननगर येथील पाणीपुरवठा अनेक कारणांनी खंडित झाल्यामुळे तेथील नागरिक हैराण झाले होते. ग्रामपंचायतीकडील पाणीपुरवठा योजनेमुळे येथील पूर्वीच्या खासगी पाणीपुरवठा व्यवस्था बंद पडल्यामुळे ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठ्यावर लोकांना अवलंबून राहावे लागत होते. अशा परिस्थितीत ग्रामपंचायतीचा दुर्लक्षामुळे पाण्यावाचून वंचित राहावे लागल्याच्या तीव्र भावना मोर्चातील महिलांनी व्यक्त केल्या.