शेंडा पार्क होणार कोल्हापूरचे नवीन प्रशासकीय मुख्य केंद्र, एकूण किती एकर जागा उपलब्ध.. वाचा
By इंदुमती सूर्यवंशी | Updated: August 19, 2025 18:34 IST2025-08-19T18:33:39+5:302025-08-19T18:34:23+5:30
२१७ एकराचा प्रस्ताव

शेंडा पार्क होणार कोल्हापूरचे नवीन प्रशासकीय मुख्य केंद्र, एकूण किती एकर जागा उपलब्ध.. वाचा
इंदुमती गणेश
कोल्हापूर : शेंडा पार्क हा कोल्हापुरातील सर्वात बहुचर्चित परिसर प्रशासकीय कार्यालयांचे मुख्य केंद्र बनणार आहे. येथे सध्या ५३७ एकर जागा उपलब्ध असून, त्यापैकी २१७ एकरातील जागांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आहे. प्रत्यक्षात मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, सर्किट बेंच आणि वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय या तीन महत्त्वाच्या कार्यालयांसाठी जागा हस्तांतरित झाली असून, प्रशासकीय इमारत व रुग्णालयांसाठीच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे.
कोल्हापुरातील शेंडा पार्क हा परिसर भविष्यात सर्व शासकीय कार्यालयांचे प्रमुख केंद्र असणार आहे. येथील वेगवेगळ्या जमिनीच्या गटांवर महापालिका, कृषी, आरोग्य, कुष्ठरुग्णांची वसाहत आणि शासन अशा वेगवेगळ्या संस्थांची मालकी आहे. आरोग्य विभागाच्या जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाचे काम सुरू आहे. सर्किट बेंचसाठी २७ एकर जागा हस्तांतरित झाली आहे. आयटी पार्कसाठीचा प्रस्ताव शासन दरबारी मान्यतेसाठी गेला आहे.
प्रत्यक्ष जागा दिलेली कार्यालये
- प्रशासकीय इमारत : १० एकर
- सर्किट बेंच : २७ एकर
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय : ३० एकर
शेंडा पार्कमधील उपलब्ध जागा हेक्टरमध्ये
मालकी असलेली कार्यालये : गट : क्षेत्र
- कृषी विद्यापीठ : १३ : १४२.०३०
- कोल्हापूर महापालिका : २ : ७.९२
- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण : १ : ०.२७
- महाराष्ट्र कृषी भवन : १ : १.१४
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय : १ : १२
- शेंडा पार्क लेपर कॉलनी : १० : ३९.८०१०
- सरकार : ३ : १२
- एकूण : २१ : २१५.१३४०
प्रस्तावित कार्यालये
- मालकी असलेला विभाग : कृषी (१४२ हेक्टर)
- आयटी पार्क : ३५.७१
- जिल्हा क्रीडा संकुल : ६.८६
- जिल्हा ग्रंथालय : ०. ८०
- मेट्रॉलॉजी लॅब : ०.४०
- पब्लिक हेल्थ लॅब : ०.३०
- प्री. एनडीए अकॅडमी : १४.७५
मालकी असलेला विभाग
- आरोग्य (३९.८०१)
- सर्किट बेंच : ९.१४
- जिल्हा क्रीडा संकुल : ३.५८
- जिल्हाधिकारी कार्यालय : ०.४२
- कृषी विभागाची सरकार हक्कातील क्षेत्र (१२)
- जिल्हाधिकारी कार्यालय : २.८०
- वखार महामंडळ गोडावून व कार्यालय : २.००
- समाज कल्याण वसतिगृह : २.६०
- करवीर पोलिस ठाणे : ०.५०
- अन्न व औषध प्रशासन : ०.१०
- नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत : ४.००