Kolhapur Politics: 'ती' ५०० एकर जमीन क्षीरसागरांच्या नावावर करणार - राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 18:17 IST2025-07-24T18:13:56+5:302025-07-24T18:17:49+5:30

जयसिंगपूर : शक्तिपीठ महामार्गाचे समर्थन करता करता आमदार राजेश क्षीरसागर इतके वाहवत गेले आहेत की माझी ५०० एकर जमीन ...

She will dedicate 500 acres of land in the name of rajesh Kshirsagar says Raju Shetty | Kolhapur Politics: 'ती' ५०० एकर जमीन क्षीरसागरांच्या नावावर करणार - राजू शेट्टी

Kolhapur Politics: 'ती' ५०० एकर जमीन क्षीरसागरांच्या नावावर करणार - राजू शेट्टी

जयसिंगपूर : शक्तिपीठ महामार्गाचे समर्थन करता करता आमदार राजेश क्षीरसागर इतके वाहवत गेले आहेत की माझी ५०० एकर जमीन असल्याचा जावईशोध त्यांनी लावला. येत्या २६ जुलैला स्वत: बिंदू चौकात हजर राहून ती सर्व ५०० एकर जमीन मी त्यांच्या नावावर करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली. 

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांच्याकडे ५०० एकर जमीन असल्याचा आरोप केला होता. याबाबत शेट्टी म्हणाले, मी गेल्या २५ वर्षात पाच निवडणुका लढविल्या. निवडणुकीत चल व अचल संपत्तीचे विवरणपत्र दिले आहे. त्या विवरणपत्रा व्यतिरिक्त क्षीरसागर यांनी आरोप केलेल्या ५०० एकर जमिनीचे सातबारे त्यांनी दाखवावे. ती सर्व जमीन राजेश क्षीरसागर यांचे नावे बक्षिसपत्र करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. 

जर क्षीरसागर शनिवारी (दि.२६) दुपारी १२ वाजता बिंदू चौकात न आल्यास त्यांनी त्यांच्या नावे असणारी सर्व संपत्ती करवीर निवासनी आई अंबाबाई मंदिराच्या नावे करावी असे आव्हान शेट्टी यांनी क्षीरसागर यांना दिले. क्षीरसागर हे आव्हान स्वीकारणार का? याकडेच आता कोल्हापूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: She will dedicate 500 acres of land in the name of rajesh Kshirsagar says Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.