गळफास घ्यायला गेली अन् सुतळी तुटल्याने पडून जखमी झाली; कोल्हापुरातील घटना
By उद्धव गोडसे | Updated: June 19, 2023 16:01 IST2023-06-19T16:00:48+5:302023-06-19T16:01:06+5:30
संबंधित महिला कौटुंबिक वादाने त्रासली होती

गळफास घ्यायला गेली अन् सुतळी तुटल्याने पडून जखमी झाली; कोल्हापुरातील घटना
कोल्हापूर : पाचगाव (ता. करवीर) येथील शांतीनगर परिसरातील एका ३० वर्षीय महिलेने रविवारी (दि. १८) दुपारी साडेतीनच्या सुमारास राहत्या घरात सुतळीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, सुतळी तुटल्याने खाली पडून महिला जखमी झाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शांतीनगर परिसरातील एक महिला कौटुंबिक वादाने त्रासली होती. रविवारी दुपारी घरात एकटीच असताना तिने घराच्या छताच्या हुकाला सुतळीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. गळफास घेताच सुतळी तुटल्याने महिला जमिनीवर पडली. यामुळे तिच्या पाठीला दुखापत झाली.
शेजारच्या व्यक्तीने त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. उपचारानंतर त्यांची प्रकृती ठिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सुदैवाने सुतळी तुटल्याने महिला बचावली. मात्र, खाली पडल्याने ती जखमी झाली. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.