शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शौर्य, साधना, शिवानीची बाजी

By admin | Updated: July 19, 2015 00:27 IST

‘ज्युनिअर मास्टर शेफ रेसिपी स्पर्धा : ‘लोकमत’ बाल विकास मंच, सखी मंच आणि बिग बझारकडून आयोजन

कोल्हापूर : शालेय वयातच सकस आणि पौष्टिक आहाराची सवय लागावी आणि स्वत: काही बनवून खाण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी ‘लोकमत’ बाल विकास मंच, सखी मंच आणि बिग बझार प्रस्तुत ‘ज्युनिअर मास्टर शेफ हेल्दी टिफिन बॉक्स रेसिपी’ स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये शौर्य राऊत, साधना पाटील, शिवानी बनछोडे, श्रावणी उपाध्ये, सिद्धी बिडकर यांनी बाजी मारली. विजेत्यांना बिग बझारचे स्टोअर मॅनेजर धनंजय घोंगडे, मार्केटिंग मॅनेजर धीरज पाटील, मार्केटिंग आॅफिसर अंकुश पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. बिग बझार येथे सखी मंच सदस्यांच्या मुलांसाठी आणि बाल विकास मंचच्या सदस्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी अनेक मुलांनी आपल्या आवडीनुसार आकर्षक सजावट करून विविध पदार्थांची मांडणी केली होती. यामध्ये मटकीची भेल, पौष्टिक पोहे, आरोग्यदायी भेळ, चाट, खाकरा मसाला, ब्रेड सॅन्डविच, पौष्टीक लाडू, बटर चाट, खोबरा लाडू, पौष्टिक भेल, खजूर लाडू, बिस्किटसॅण्डविच, भाकरीचे सॅण्डविच, झटपट दहीवड्यासह अनेक पदार्थ मांडण्यात आले होते. या स्पर्धेत ८ ते १६ या वयोगटांतील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. प्रत्येक स्पर्धकाला रेसिपी तयार करण्यासाठी एक तासाचा वेळ दिला गेला होता. रेसिपी तयार करून स्पर्धक आपल्या आईच्या मदतीने या ठिकाणी पदार्थ मांडत होते. तसेच प्रत्येक पदार्थासोबत त्याची रेसिपीही या ठिकाणी लिहिली होती. पौर्णिमा होसमनी यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. एकूण शंभरहून अधिक बाल विकास मंचच्या सभासदांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील सर्व सहभागी बाल विकास मंचच्या सदस्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. सखी मंच व बाल विकास मंचच्या सदस्यांना अधिक सूट देण्याचे यावेळी बिग बझारतर्फे जाहीर करण्यात आले. येथील दर्जेदार व स्वस्त वस्तूंचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन बिग बझारचे स्टोअर मॅनेजर धनंजय घोंगडे यांनी याप्रसंगी केले. यावेळी सहभागी स्पर्धकांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. विजेत्यांना बिग बझारतर्फे आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. ( प्रतिनिधी )