शरद पवार यांची फसलेली 'राजनिती'; बाळासाहेबांसोबतचा सांगितला तो किस्सा

By पोपट केशव पवार | Updated: September 3, 2024 13:42 IST2024-09-03T13:40:21+5:302024-09-03T13:42:36+5:30

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री देशाला सर्वश्रुत ...

Sharad Pawar told the story of Rajniti Magazine with Balasaheb Thackeray | शरद पवार यांची फसलेली 'राजनिती'; बाळासाहेबांसोबतचा सांगितला तो किस्सा

शरद पवार यांची फसलेली 'राजनिती'; बाळासाहेबांसोबतचा सांगितला तो किस्सा

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री देशाला सर्वश्रुत आहे. याच मैत्रितला एक किस्सा पवार यांनी मंगळवारी कोल्हापुरात एका कार्यक्रमात सांगताच उभे सभागृह हास्यकल्लोळात बुडाले. 

पवार म्हणाले, मी, बाळासाहेब, व्ही.के.देसाई व शशि शेखर या चौघांनी 'राजनिती' नावाचे एक मासिक सुरु करण्याचा निर्णय घेतला. यासाठी पुण्यात बाळासाहेबांच्या घरी एक बैठकही झाली.  त्यानुसार प्रत्येकांनी ५ हजार या प्रमाणे २० हजार रुपये गोळा करुन हे मासिक सुरु केले. 

बाळासाहेबांच्या एका मित्राने याचा पहिला अंक मुंबईतील सिद्धीविनायकापुढे ठेवण्याचा सल्ला दिला. हा अंक सिद्धीविनायकापुढे ठेवाल तर बाहेर स्टॉलवर एकही अंक शिल्लक राहणार नाही असेही या मित्राने सांगितले. या मित्राच्या सल्ल्यानुसार आम्ही चौघांनी पहिला अंक सिद्धीविनायकापुढे ठेवला. मात्र, त्यानंतर आमचा 'राजनिती'चा एकही अंक निघाला नाही असे पवार यांनी सांगताच सभागृहात हास्याचे फवारे उडाले.

Web Title: Sharad Pawar told the story of Rajniti Magazine with Balasaheb Thackeray