शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शक्तिपीठ महामार्गास विरोध, महायुतीचे १२ जिल्ह्यांतील ७२ उमेदवार पाडणार; शेतकऱ्यांचा कोल्हापुरात ठराव 

By संदीप आडनाईक | Updated: October 21, 2024 17:59 IST

राजकीय परिवर्तन गरजेचे : खा. शाहू छत्रपती

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग रद्द न करणाऱ्या महायुतीचे १२ जिल्ह्यांतील ७२ उमेदवार पराभूत करण्याचा निर्धार कोल्हापुरात सोमवारी झालेल्या राज्यव्यापी निर्धार परिषदेत शेतकऱ्यांनी ठरावाद्वारे केला. कोल्हापुरात शाहू स्मारक भवन येथे सोमवारी शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद पार पडली. या परिषदेत शक्तिपीठ महामार्ग बाधित १२ जिल्ह्यांतील शेतकरी सहभागी झाले होते. परिषदेचे उद्घाटन खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते झाले. या परिषदेत माजी आमदार संजयबाबा घाटगे, राष्ट्रवादीचे नेते समरजित घाटगे, किसान सभेचे राज्य अध्यक्ष उमेश देशमुख, अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या दिल्ली राज्य सहसचिव डॉ. प्रा. अमृता फाटक, गिरीश फोंडे, उद्धवसेनेचे नेते विजय देवणे, प्रकाश पाटील, विक्रांत पाटील, सुभाष जाधव, आनंदा पाटील, दादा पाटील, योगेश कुळवमोडे, के. डी. पाटील यांनी मार्गदर्शन केले.खासदार शाहू छत्रपती म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग विरोधात मार्च महिन्यापासूनच कोल्हापुरातील शेतकरी अत्यंत आक्रमकपणे आंदोलन करत आहेत, परंतु सत्तारूढ सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे आता राजकीय परिवर्तन झाल्याखेरीज शक्तिपीठ महामार्ग रद्द होणार नाही. संजयबाबा घाटगे म्हणाले, आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी शक्तिपीठ महामार्ग रद्दची लेखी घोषणा होईल याकडे शेतकरी आशेने पाहत होते. पण, महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. समरजित घाटगे म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाबाबत सर्वच शेतकऱ्यांमध्ये खदखदत असणाऱ्या असंतोषाला वाट मिळाली आहे. अनेक तालुक्यांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना शेतकरी प्रचारादरम्यान अडवून जाब विचारत आहेत. गिरीश फोंडे म्हणाले, महायुती सरकारने महामार्ग रेटण्याचे ठरवलेले होते. त्यामुळे आंदोलन सुरू असतानाही त्यांनी कोणतीच ठोस भूमिका घेतली नाही.या परिषदेत बीड येथील लालासाहेब शिंदे, लातूर येथील अनिल ब्याळे, धनपाल गवळी, सांगली येथील उमेश येडगे, नांदेड येथील सतीश कुलकर्णी, सोलापूर येथील गणेश घोडके, परभणी येथील विठ्ठल गरूड, आदी शेतकरी सहभागी झाले. शिवाजी मगदूम यांनी प्रास्ताविक केले. दादासाहेब पाटील यांनी आभार मानले. यावेळी सम्राट मोरे, आनंदा पाटील, प्रकाश पाटील, कृष्णात पाटील, शिवाजी कांबळे, सुधाकर पाटील, शिवाजी पाटील, युवराज शेटे, योगेश कुळवमोडे, नितीन मगदूम, दादासो पाटील, युवराज कोईंगडे, मच्छिंद्र मुगडे, जालिंदर कुडाळकर, साताप्पा लोंढे, तानाजी भोसले, आनंदा देसाई उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गFarmerशेतकरीvidhan sabhaविधानसभाMahayutiमहायुती