शक्तिपीठ होणार पण कोणावर लादणार नाही, मंत्री हसन मुश्रीफांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 13:06 IST2025-06-07T13:05:28+5:302025-06-07T13:06:27+5:30

हाके, टीका करताना भान बाळगा

Shaktipeeth will be established but will not be imposed on anyone, Minister Hasan Mushrif gave information | शक्तिपीठ होणार पण कोणावर लादणार नाही, मंत्री हसन मुश्रीफांनी दिली माहिती

शक्तिपीठ होणार पण कोणावर लादणार नाही, मंत्री हसन मुश्रीफांनी दिली माहिती

कोल्हापूर : शक्तिपीठसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केलेली नाही. तरीही विरोध असलेल्या शेतकऱ्यांची जमीन घेणार नाही. पण, काही शेतकरी जादा दराची मागणीही करत आहेत. त्यामुळे शक्तिपीठ होणार पण तो कोणावरही लादणार नाही, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी शक्तिपीठ महामार्ग रद्दबाबत अधिसूचना काढली होती. त्यानंतर भूसंपादनाचे काम अद्याप सुरू नाही. तरीही ज्या शेतकऱ्यांचा जमीन देण्यास विरोध आहे, त्यांना सोडून जे देणार आहेत, त्यांच्याकडून घेऊन महामार्ग करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे.

लक्ष्मण हाकेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना भान ठेवावे. उपमुख्यमंत्री पवार हे गेली ४० वर्षे राजकारण व समाजकारणात आहेत. अशा व्यक्तीवर टीका करणे योग्य नाही. त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाने त्यांना समज द्यावी. त्यांनी आपली पायरी ओळखून बोलावे, उगीच महायुतीत गोंधळ होईल, असे वक्तव्य करू नये.

शेतकऱ्यांचा अपमान होईल, असे कृषिमंत्र्यांनी बोलू नये

वास्तविक कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत अपमानकारक बोलू नये, याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी अनेकवेळा समज दिली आहे. आता ते यातून बोध घेतील, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

विशाळगडबाबत सर्वांनी काळजी घ्या

विशाळगडबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी लक्ष घातले आहे. कायदा, सुव्यवस्था चांगली राहील यासाठी सगळ्यांनी काळजी घ्यावी, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

Web Title: Shaktipeeth will be established but will not be imposed on anyone, Minister Hasan Mushrif gave information