शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

सातशे वर्षांपूर्वीची ऐतिहासिक मस्जिद

By admin | Updated: July 6, 2015 00:26 IST

शिरोळ तालुक्यात १०५ मस्जिदी : हिंदू-मुस्लिम ऐक्याची कुरुंदवाडला परंपरा

संदीप बावचे -जयसिंगपूर -शिरोळ तालुक्यातील मस्जिदींना ऐतिहासिक महत्त्व आहे. शिरोळ येथे सातशे वर्षांपूर्वीचा इतिहास सांगणाऱ्या मस्जिदी आहेत. विजापूरच्या आदिलशाही काळातील मस्जिदी म्हणून यांचा आजही उल्लेख होतो. कुरुंदवाडच्या मस्जिदीही हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा जपणाऱ्या आहेत. तालुक्यात सर्वसाधारण लहान-मोठ्या १०५ मस्जिदींमधून नमाज पठण होते. सांगली आणि कर्नाटक सीमाभागाशी जोडणाऱ्या शिरोळ तालुक्यात जयसिंगपूर १३, कुरुंदवाड ४२, नांदणी ११, दानोळी १३, तर शिरोळ २६ अशा विभागांमध्ये मस्जिदी आहेत, तर कुरुंदवाड शहरामध्ये दहा व उदगावमध्ये सात मस्जिदी आहेत. आलास, गौरवाड, शिरोळ, कनवाड या परिसरामध्ये जुन्या मस्जिदी असून, येथील मस्जिदींना ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. रमजान महिन्यात तरावीहला अनन्यसाधारण महत्त्व असते. तसेच शिरोळ तालुक्यामध्ये धार्मिक शिक्षण देणारे मदरसेही आहेत. शिरोळ येथे काळी मस्जिद व पांढरी मस्जिद असून, काळ्या मस्जिदीमध्ये पीर बसविले जातात, तर पांढऱ्या मस्जिदीमध्ये नमाज पठण केले जाते. विजारपूरच्या आदिलशाही काळातील या मस्जिदी असून, इतिहासात त्याची नोंद आहे. मुस्लिम सुन्नत जमात ट्रस्ट अंतर्गत या मस्जिदीचे सिकंदर बागसार हे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. आलासमध्ये अडीचशे वर्षांपूर्वीची जामा मस्जिद असून, सुमारे सातशे वर्षांपूर्वीचा इतिहास सांगणारा हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा असलेला दर्गा आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याची कृतिशील परंपरा म्हणून कुरुंदवाड शहराकडे पाहिले जाते. अशा या शहरात दहा मस्जिदी आहेत. सर्वच मस्जिदींमध्ये रमजान महिन्यात मुस्लिम बांधव नमाज पठण, रोजा, तरावीह पठण, दानधर्म मोठ्या धार्मिक वातावरणात करतात. शहरातील झारी मस्जिद म्हणून सर्वांत जुनी मस्जिद आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वी येथील मुख्य चौकातील इमामसाहेब झारी यांच्या दोन गुंठे जागेत १९०३ ला ही मस्जिद स्थापन करण्यात आली आहे. २००७ ला मस्जिदीची ट्रस्ट नोंदणी झाली असून, बालेचॉँद म्हमुलाल अपराध हे अध्यक्ष आहेत.अब्दुललाट या सुमारे वीस हजार लोकसंख्येच्या ठिकाणी अंदाजे दोन हजार लोकसंख्या असलेला मुस्लिम समाज गुण्यागोविंदाने राहत आहे. पहिली मस्जिद ही पिराची मस्जिद म्हणून ओळखली जाते. बादशाही काळापासून तेथे चालत असलेले नमाज पठण १९८५ पासून बंद आहे. त्याठिकाणी ‘मोहरम’ साजरा होतो. त्यानंतर १९७२ मध्ये ‘आझाद मोहल्ला’ या नावाने मस्जिद बांधली. कबरस्तान आवारामध्ये १९८५ ला मस्जिद बांधण्यात आली. ही जागा मुलकी पाटील बाळासाहेब रायगोंडा पाटील (नांगरे) यांनी १९५० ला दान म्हणून दिली आहे. त्या मस्जिदीस स्ट्रॅँड मोहल्ला असे नाव देण्यात आले आहे. याठिकाणी १९८५ ला बांधलेली मस्जिद पडली आणि आता गावातील बांधवांच्या आणि कबरस्थानात मस्जिद वक्फबोर्ड, औरंगाबाद यांच्या सहकार्याने सुमारे ५० लाख रुपये खर्च करून नवीन, देखणी मस्जिद आकारास येत आहे. त्यानंतर वसाहत वाढली. १९९० ला तिथेही एक मस्जिद बांधण्यात आली. ही मस्जिद बांधण्यासाठी इलाई तांबोळी यांनी ही जागा मोफत दिली आहे.या तिन्ही मस्जिदींमध्ये हाफीज मुस्तफा मुल्ला, हसन नांदणीकर, मौलाना बागवान यांच्याकडून अरबी भाषेत लहान मुलांना धार्मिक शिक्षण, विधी, आचार-विचार याचे शिक्षण दिले जाते. इसाक मौला मुल्ला हे मुस्लिम सुन्नत जमातचे अध्यक्ष असून, बाबालाल शेख, हुुसेन कादर शेख, फारुख बकस मुल्ला, हसन सुलतान सनदी, महंमद दावल नांदणीकर, हाफीज अकबर गजबर मुल्ला, हसन नबी हारुगुरे, के. बी. मुल्ला, यासीन जिनूल गवंडी यांच्याकडे समाजाचे पंच घटक म्हणून पाहिले जाते. उदगाव येथील जामिया खरूल उलूम मदरसा हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वांत मोठा मदरसा असून, येथे उर्दू व अरबी भाषांमध्ये शिक्षण घेण्यासाठी परराज्यांतून विद्यार्थी येत असतात. हा मदरसा इराणी मौलाना हे चालवीत आहेत. तसेच सम्मुद्दीयॉँ महमुद्दीयाँ तालिमूल कुरआन मदरसा हा देखील जुना मदरसा असून, मौलाना जमनुल्ला इराणी हे चालवितात.