शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षांच्या आतील शिक्षेबाबत फेरयाचिका हवी

By admin | Updated: December 22, 2014 00:24 IST

उज्ज्वल निकम यांचे मत : अन्यथा गुन्हेगार मोकाट फिरतील

कोल्हापूर : चोरी, मारामारी, फसवणूक, मटका, जुगार, अशा सात वर्षांच्या आतील शिक्षेच्या गुन्ह्णांमध्ये आरोपींना थेट अटक करता येणार नाही. अटक केल्यास, का केली? याचा लेखी खुलासा पोलिसांना न्यायालयात सादर करावा लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशाच्या विरोधात फेरयाचिका दाखल करण्याची आज नितांत गरज आहे; अन्यथा गंभीर गुन्ह्णांतील आरोपी दिवसाढवळ्या गुन्हे करीत मोकाट फिरतील, असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. खासगी कार्यक्रमानिमित्त ते आज, रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. पोलिसांना सात वर्षांपर्यंत शिक्षा व दंड असलेल्या सर्वच गुन्ह्णांमध्ये आरोपींना थेट अटक करता येत नाही, या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशासंदर्भात बोलताना अ‍ॅड. निकम म्हणाले, न्यायालयाच्या आदेशाविरोधात फेरयाचिका दाखल करून हा आदेश रद्द केला पाहिजे; अन्यथा सराईत गुन्हेगार या कायद्याच्या आधारे राजरोस गुन्हे करून मोकाट फिरतील. आत्मदहन किंवा आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलीस ३०९ प्रमाणे संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करीत होते. न्यायालयाने हे कलम रद्द केले आहे. या संदर्भात बोलताना ते म्हणाले, एखादी व्यक्ती ही जीवनाचा कंटाळा आल्यानंतरच अशा निर्णयापर्यंत पोहोचत असते आणि ते करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याच्यावर उलट गुन्हा दाखल केला, तर मनाने ती व्यक्ती जास्तच खचून जाते. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याऐवजी त्याची मानसिकता बदलण्यासाठी त्याला मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे न्यायालयाने घेतलेला निर्णय हा योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. एकमेकांवर कुरघोड्या करण्याची व अतिरेक्यांना प्रोत्साहन देण्याची पाकिस्तानची जुनी सवय आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीचे सदस्य अजिज हे बेमालूमपणे खोटे बोलत आहेत की, २६-११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा खटला भारतामुळे लांबणीवर पडला. जनतेची दिशाभूल करून त्यांच्या जखमेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. अतिरेक्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केवळ पाकिस्तान करीत आहे. त्यामुळेच त्यांनी मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणल्याचे निकम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)